सप्टेंबर महिन्यात 29 लाख 51 हजार 157 डोस, मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर मिळून 16 जानेवारी 2021 ते आज 30 सप्टेंबर 2021 (सायंकाळी 7 वाजेपर्यंत) या कालावधीत कोविड-19 प्रतिबंधक लशीच्या 1 कोटी 23 लाख 11 हजार 541 इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

सप्टेंबर महिन्यात 29 लाख 51 हजार 157 डोस, मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद
मुंबईतील शहरी बेघरांसंदर्भात धोरण बनविण्यासाठी होणार सर्व्हेक्षण
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 9:42 PM

मुंबई : अधिकाधिक मुंबईकर नागरिकांचे आणि सर्व समाज घटकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या अथक प्रयत्नांचा परिपाक म्हणून सप्टेंबर 2021 या एकाच महिन्यात मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात 29 लाख 51 हजार 157 डोस दिले गेले आहेत. यामध्ये शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचांही समावेश आहे. (29 lakh 51 thousand 157 doses in the month of September, record number of vaccinations)

सप्टेंबरमध्ये दुप्पट लससाठा प्राप्त

जुलै, ऑगस्ट महिन्यात सुमारे 10 लाख लशींचा सरासरी साठा प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जवळपास दुप्पट म्हणजे 19 लाख 25 हजार 140 लससाठा प्राप्त झाला. तरीही संपूर्ण लससाठ्याचा विनियोग होईल, अशा रितीने लसीकरणाला वेग देण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर मिळून 16 जानेवारी 2021 ते आज 30 सप्टेंबर 2021 (सायंकाळी 7 वाजेपर्यंत) या कालावधीत कोविड-19 प्रतिबंधक लशीच्या 1 कोटी 23 लाख 11 हजार 541 इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला या कालावधीत एकूण 77 लाख 62 हजार 470 लसींचा साठा प्राप्त झाला. त्यातून आजवर 76 लाख 96 हजार 833 एवढ्या मात्रा देण्यात आल्या. मुंबईकर नागरिकांचे लसीकरण अत्यंत वेगाने करण्यात येत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात, 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांचा विचार केला तर वेगाने लसीकरण करण्याबाबत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे, ही बाब उल्लेखनीय आहे.

जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरणासाठी महापालिका सतत प्रयत्नशील

कोविड 19 प्रतिबंध राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत 16 जानेवारी 2021 पासून मुंबई महानगरात अधिकाधिक वेगाने व जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. लसीकरणाची व्याप्ती टप्प्या-टप्प्याने वाढू लागली तशी लस साठ्याची गरजही वाढली. प्रारंभीच्या काळामध्ये, पुरेसा लससाठा प्राप्त झाला नाही, त्या दिवसांसाठी लसीकरण नाईलाजाने बंदही ठेवावे लागत होते. मात्र आता पुरेसा लससाठा प्राप्त होत असल्याने त्याच वेगाने लसीकरण करण्याचे सातत्य टिकून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लससाठा प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्यापासून ते लससाठा मिळाल्यानंतर जलदगतीने लसीकरण करेपर्यंत महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अथक प्रयत्न व अचूक नियोजन करते आहे. लससाठा मिळताच त्याचा 2 ते 3 दिवसात संपूर्ण विनियोग केला जातो. लससाठा साठवण क्षमता आणि लस देण्याची क्षमता या दोन्ही पैलुंचे बारकाईने नियोजन केल्याने लसीकरण वेगाची ही क्षमता साध्य झाली आहे.

सर्व समाज घटकांचे वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर

लसीकरण मोहिमेला वेग देताना महानगरपालिकेने विविध समाज घटकांचा देखील विचार करुन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण, अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, विदेशात शिक्षण अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणारे नागरिक, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि 18 वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.

एकूण 464 कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित

जानेवारी 2021 मध्ये मुंबई महानगरात शासकीय व महानगरपालिका मिळून एकूण 12 लसीकरण केंद्र होती. तर त्यावेळी एकही खासगी केंद्र नव्हते. आजघडीला मुंबई महानगरात शासकीय व महानगरपालिका मिळून 325 तर खासगी 139 असे एकूण 464 कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही योग्यरित्या वाढवत नेल्याने लसीकरणाला गती देण्यास हातभार लागला आहे.

प्रारंभी, महानगरपालिकेच्या वतीनेच लस खरेदी करुन त्यातून खासगी केंद्रांना लससाठा पुरविण्यात येत होता. 1 मे 2021 पासून सुधारित धोरणानुसार खासगी केंद्राना लस खरेदीची परवानगी मिळाली. ही बाब लक्षात घेता, जानेवारी ते एप्रिल 2021 या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला 25 लाख 94 हजार 450 इतका लससाठा मिळाला. पैकी, शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर 18 लाख 23 हजार 567 तर खासगी केंद्रांवर 6 लाख 24 हजार 551 असे एकूण 24 लाख 48 हजार 118 डोस देण्यात आले होते.

मे ते सप्टेंबर 2021 या काळात 98 लाख 63 हजार 423 जणांनी घेतली लस

खासगी केंद्रांना लस खरेदीची मुभा मिळाल्यानंतरच्या कालावधीत म्हणजे 1 मे 2021 ते आज 30 सप्टेंबर 2021 सायंकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत महानगरपालिकेला एकूण 51 लाख 68 हजार 020 लस मात्रा प्राप्त झाल्या. याच कालावधीत शासकीय व महानगरपालिका केंद्र मिळून एकूण 52 लाख 48 हजार 715 इतके डोस देण्यात आले. या कालावधीत मुंबईतील खासगी केंद्रांवर 46 लाख 14 हजार 708 नागरिकांना लस मिळाली. म्हणजेच मे ते सप्टेंबर 2021 या काळात शासकीय, महानगरपालिका, खासगी केंद्र असा एकत्रित विचार करता 98 लाख 63 हजार 423 जणांनी लस घेतली आहे. जानेवारी ते एप्रिल 2021 या कालावधीच्या तुलनेत हा वेग कितीतरी अधिक आहे. (29 lakh 51 thousand 157 doses in the month of September, record number of vaccinations)

इतर बातम्या

ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार? दापचारीला पार्किंगची सोय, एकनाथ शिंदेंची पाहणी

पाटस ते लोणी काळभोर मार्गाचा समावेश ‘संत तुकाराम महाराज भक्ती मार्गा’मध्ये करावा, राहुल कुल यांची मागणी

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.