AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाटस ते लोणी काळभोर मार्गाचा समावेश ‘संत तुकाराम महाराज भक्ती मार्गा’मध्ये करावा, राहुल कुल यांची मागणी

दौंड तालुक्यातील पाटस ते हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या रस्त्याचा समावेश संत तुकाराम महाराज भक्ती मार्गामध्ये करावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी गडकरी यांच्याकडे केली.

पाटस ते लोणी काळभोर मार्गाचा समावेश 'संत तुकाराम महाराज भक्ती मार्गा'मध्ये करावा, राहुल कुल यांची मागणी
RAHUL KUL NITIN GADKARI
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 8:37 PM
Share

पुणे : दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी आज (30 सप्टेंबर) केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी दौंड तालुक्यातील पाटस ते हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या रस्त्याचा समावेश संत तुकाराम महाराज भक्ती मार्गामध्ये करावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी गडकरी यांच्याकडे केली.

वाहतुकीस होणारा व्यत्यय टाळण्यासाठी निर्णय घ्यावा

संत तुकाराम महाराज पालखीमध्ये हजारो वारकरी बांधवांचा समावेश असतो. त्यामुळे सुरक्षितता, भविष्यातील वाढती वाहतुक व पालखी दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीस होणारा व्यत्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात यावा असे, कुल यांनी आपल्या मागणीमध्ये म्हटले आहे.

वारकरी बंधू, भगिनींना आवश्यक सुविधा पुरवाव्यात 

तसेच कवडीपाट, लोणी काळभोर ते पाटस या रस्त्याचा समावेश संत तुकाराम महाराज भक्ती मार्गामध्ये करावा. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाला गती मिळावी.  या मार्गामध्ये “भक्ती मार्गाच्या” धर्तीवर वारकरी बंधू भगिनींसाठी विविध आवश्यक सुविधा उभारण्यात याव्यात, अशीदेखील मागणी कुल यांनी गडकरी यांच्याकडे केली.

खर्डा ते कुर्डूवाडी रस्त्याचे काम रखडले, रोहित पवार- नितीन गडकरी भेट

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील यापूर्वी  16  सप्टेंबर रोजी पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गामधील खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेले 114 कि. मी. चे काम जलदगतीने सुरु करण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.  या भेटीत संत एकनाथ महाराज, संत भगवान बाबा, संत गीतेबाबा, संत गोरोबा कुंभार यांसारख्या प्रख्यात संतांच्या पालख्या आणि लाखो यात्रेकरूंसह अनेक दिंड्या या मार्गाने पंढरपूरला जात असतात. खर्डा गावापर्यंतच्या मार्गाचे काम आधीच प्रगतीपथावर आहे. मात्र खर्डा ते कुर्डुवाडीपर्यंतचा पुढील भाग अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्यात यावा, अशी विनंती रोहित पवार गडकरी यांच्याकडे केली होती.

इतर बातम्या :

पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसणं दुर्दैव, सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरु, प्रशांत जगताप यांचा आरोप

VIDEO : पैशांचा माज, कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईतील धक्कादायक घटना

अनाथ आरक्षणाचा पहिला लाभार्थी ! नारायण इंगळे बनला प्रादेशिक वन अधिकारी, यशोमती ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

(MLA Rahul Kul meets Nitin Gadkari demands road from Patas to Loni Kalbhor should include in Sant Tukaram Maharaj Bhakti Marg)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.