कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे : गृहमंत्री

कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे : गृहमंत्री
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 5:36 PM

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली. ते विधानपरिषदेत बोलत होते. राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान सुरु असलेल्या चर्चेत अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.

“कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी 649 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. मात्र, सार्वजनिक मालमत्तेवर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमधील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत”, असे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी सांगितलं. याशिवाय नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे घेतले असून शेतकरी आंदोलनातील गुन्हेदेखील मागे घेऊ, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.

“राज्य शासनाकडून कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरु होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती”, असंदेखील अनिल देशमुख यांनी सांगितलं.

“भीमा कोरेगावच्या तपासादरम्यान अनेक शिष्टमंडळे भेटली. तत्कालीन सरकारने आपल्या विरोधात बाजू असेल तर त्याला शहरी नक्षलवाद म्हटले”, असा टोला अनिल देशमुख यांनी भाजपला लगावला. या प्रकरणाची चुकीच्या दिशेने चौकशी झाली असेल तर महाराष्ट्र सरकार पोलीस अॅक्ट किंवा एनआयए सेक्शन 10 नुसार त्यावर चौकशीचा विचार करेल, असंदेखील अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.