सवर्ण आरक्षण ते टीव्ही चॅनल, आजपासून तुमच्या आयुष्यात होणारे 5 बदल

मुंबई: नव्या वर्षातील दुसऱ्या महिन्याचा आज पहिला दिवस अर्थात 1 फेब्रुवारी. आजपासून आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल होणार आहेत. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. आजपासून 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू होणार आहे. दुसरीकडे अनेक वस्तू-सेवांच्या किमतीतही बदल होणार आहे. आजपासून टीव्ही चॅनेलचे नवे दर लागू होणार आहेत. शिवाय होंडा कारच्या किमती बदलल्या आहेत. आजपासून […]

सवर्ण आरक्षण ते टीव्ही चॅनल, आजपासून तुमच्या आयुष्यात होणारे 5 बदल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: नव्या वर्षातील दुसऱ्या महिन्याचा आज पहिला दिवस अर्थात 1 फेब्रुवारी. आजपासून आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल होणार आहेत. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. आजपासून 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू होणार आहे. दुसरीकडे अनेक वस्तू-सेवांच्या किमतीतही बदल होणार आहे. आजपासून टीव्ही चॅनेलचे नवे दर लागू होणार आहेत. शिवाय होंडा कारच्या किमती बदलल्या आहेत. आजपासून काय काय बदलणार त्यावर एक नजर –

1 फेब्रुवारीपासून सवर्ण आरक्षण

केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण दिलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आरक्षणाबाबतच्या घटनादुरुस्ती विधेयकावर हस्ताक्षर करत या विधेयकाला मंजुरी दिली. हे आरक्षण आजपासून केंद्र आणि राज्यांमध्ये लागू होईल. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेती आहे, ज्यांच्याकडे 1 हजार स्क्वेअर फुटापेक्षा लहान घर आहे, ज्यांच्याकडे 109 गज पेक्षा कमी (सुमारे 430 चौ. फूट) अधिसूचित जमीन, ज्यांच्याकडे महापालिकेची 209 गज विना अधिसूचित जमीन आहे, हे सर्वजण सवर्ण आर्थिक आरक्षणासाठी पात्र असतील.

या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारपदाच्या अधिकाऱ्याचा असावा. सवर्ण आरक्षण सध्या गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि झारखंड सरकारने लागू केलं आहे. वाचा:  सवर्ण आरक्षण मिळण्यासाठी ही सात कागदपत्र आवश्यक

टीव्ही चॅनलच्या किमती बदलल्या

TRAI ने DTH कंपन्या आणि केबल ऑपरेटर्ससाठी नवे नियम बनवले आहेत. हे नियम आजपासून लागू झाले आहेत. ग्राहक आपल्या मनाप्रमाणे चॅनल निवडून, त्याप्रमाणे पैसे भरु शकतात. जो चॅनल पाहाचा आहे, त्याचेच पैसे द्यावे लागतील.

ट्रायने प्राथमिक चॅनलमध्ये 100 चॅनल्सचा समावेश केला आहे, ज्यामध्ये फ्री टू एअर चॅनल्सचाही समावेश आहे. बेस पॅकसाठी 130 रुपये असेल.

वाचा – ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा आज रात्रीपासून टीव्ही बंद होणार

मुंबईत उबरची स्पीड बोट

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उबरने स्पीड बोट सेवा लॉन्च केली आहे. ही सेवा आजपासून सुरु होत आहे.  कॅब सेवा देणारी उबर आता स्पीड बोट सेवा देणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या जलमार्गावर लवकरच ही सेवा सुरु होणार आहे. ही मुंबईतील सर्वात जलद बोट सेवा असेल. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा हे अंतर 19 किमी आहे. स्पीड बोटने हे अंतर कापण्यासाठी केवळ 20 ते 22 मिनिटे लागणार असल्याचं सांगण्यात आलंय. एका वेळी 6-8 प्रवासी नेण्याची या बोटीची क्षमता असेल.

वाचा:  मुंबई ते मांडवा फक्त 20 मिनिटात गाठा, जलवाहतुकीतही उबरची एंट्री

 सेव्हिंग अकाऊंटमधील किमान बॅलेन्स मर्यादेत वाढ

बॅँक ऑफ बडोदामध्ये तुमचं सेव्हिंग अकाऊंट असेल, तर आजपासून या बँकेने काही बदल केले आहेत. बॅँक ऑफ बडोदाने शहरी ग्राहकांच्या किमान बॅलेन्स मर्यादा 1 हजार वरुन 2 हजार रुपये केली आहे. अर्थ शहरी भागात 500 रुपयावरुन 1 हजार रुपये करण्यात आली आहे. ग्रामीण भागात कोणताही बदल केलेला नाही.

होंडा कार 10 हजार रुपयांपर्यंत महागणार 

1 फेब्रुवारीपासून होंडाच्या कार महागणार आहेत. सीआरव्ही मॉडेलच्या किमती 10 हजार रुपये तर दुसऱ्या मॉडेल्सच्या किमती 7 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहेत. यामध्ये होंडा ब्रायो, होंडा जॅज, होंडा अमेज, होंडा सिटी, होंडा डब्ल्यूआर-वी, होंडा बीआर-वी, होंडा सीआर-वी गाड्यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.