AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा, ‘या’ फोटो मागची कहानी वाचून काळजाचा ठोका चुकेल

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वर्षाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा, 'या' फोटो मागची कहानी वाचून काळजाचा ठोका चुकेल
| Edited By: | Updated on: Jan 01, 2021 | 9:02 PM
Share

वसई : वसईत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 18 वर्षाच्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. भरागाव वेगात येणाऱ्या मोटारसायकल स्वाराने रस्ता क्रॉस करणाऱ्या तरुणीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (a 18 year young girl died in truck accident in vasai )

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर तरुणी गंभीर जखमी अवस्थेत अपघातस्थळी पडली होती. पण जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता तिला डॉक्टरांनी मयत घोषित केलं. अल्फिया सय्यद असं अपघातात मयत झालेल्या तरुणीचं नाव आहे. ती बारावीचे शिक्षण करून घराच्या मदतीसाठी जॉब ही करायची. आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी 10 च्या सुमारास वसईच्या रेंज नाक्याजवळ, कामावर जाण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना हा अपघात झाला.

रस्ता ओलांडताना समोरुन येणाऱ्या भरधाव मोटारसायकल स्वाराने तिला जोरदार धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. मात्र, उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोटारबाईकचा तपास करून, मोटार सायकल तसेच आरोपीलाही ताब्यात घेतलं आहे. मयत मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. खरंतर, तरुणीच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर तिच्या मित्र परिवारातही तिच्या अशा जाण्यामुळे शोककळा पसरली आहे. (a 18 year young girl died in truck accident in vasai )

संबंधित बातम्या –

धक्कादायक घटना! सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण वाचून हादराल

बेपत्ता पत्नी साडेतीन वर्षांनी प्रियकरासोबत सापडली, शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा

सततच्या डोकेदुखीमुळे डॉक्टरांकडे गेला, चेकअप केल्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य

(a 18 year young girl died in truck accident in vasai )

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.