शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोना रुग्ण बेपत्ता, मृतदेह बोरिवली स्टेशनजवळ सापडला

शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह चक्क बोरिवली स्टेशनजवळ सापडला. (Shatabdi Hospital missing corona patient found dead)

शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोना रुग्ण बेपत्ता, मृतदेह बोरिवली स्टेशनजवळ सापडला

मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह चक्क बोरिवली स्टेशनजवळ सापडला. (Shatabdi Hospital missing corona patient found dead) रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धचा थेट मृतदेहच सापडल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय यानिमित्ताने मोठा प्रश्न हा आहे की, रुग्णालयातून हे आजोबा बोरिवली स्टेशनपर्यंत पोहोचलेच कसे?

विठ्ठल मुळे असं मृत वृद्धाचं नाव आहे.  मुळे कुटुंबीयांच्या माहितीनुसार, विठ्ठल मुळे यांना शनिवारी दुपारी तीन वाजता कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केलं होतं. रविवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास रुग्णालयातून मुळे कुटुंबाला फोन आला की विठ्ठल मुळे हे बेडवर नाहीत.

विठ्ठल मुळे हे रुग्णालयातून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली, मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी मालाड, बोरिवली आणि कांदिवली पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या चौकशीमध्ये सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास रेल्वे पोलिसांना बोरिवली स्टेशनजवळ एक अज्ञात मृतदेह सापडला. पोलिसांनी याची कल्पना मुळे कुटुंबाला दिली. मुळे कुटुंबांनी मृतदेह ओळखून तो मृतदेह विठ्ठल मुळे यांचाच असल्याचं निदर्शनास आलं.

दरम्यान, या वृद्धाच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. महापालिका रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचं पुन्हा पुन्हा समोर येत आहे. काही दिवसापूर्वीच केईएम रुग्णालयातून 75 वर्षीय कोरोनाबाधित सुधाकर खाडे गायब झाले होते. तब्बल 15 दिवसांच्या शोधानंतर, त्यांचाही मृतदेह सापडला होता. रुग्णालयाच्याच शवागृहात त्यांचा मृतदेह आढळला होता. (Shatabdi Hospital missing corona patient found dead)

मात्र शताब्दी रुग्णालयाचा प्रकार यापेक्षा वेगळा आहे. या रुग्णालयातून काल पहाटेपासून 80 वर्षीय आजोबा बेपत्ता होते. ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दोषींवर कारवाई करु : अमेय घोले 

याप्रकरणी आम्ही माहिती घेत असून, जो कोणी अधिकारी दोषी आढळेल त्यांच्यावर नक्कीच कारवाई करु, असं पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं. मी आणि महापौर आता रुग्णालयाकडे जात आहोत. आम्ही सविस्तर माहिती घेऊन कारवाई करु, असं घोले यांनी सांगितलं.

केईएम रुग्णालयातील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह सापडला

केईएम रुग्णालयातून अचानक गायब झालेले 75 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सुधाकर खाडे यांचा मृतदेह 2 जून रोजी रुग्णालयाच्या शवागृहात सापडला. खाडे यांचा मृतदेह नातेवाईकांनी ओळखला असून ताब्यातही घेतला.(Missing Corona Patient found in KEM hospital).

सुधाकर खाडे हे गायब झाल्याने याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. याप्रकरणी खाडे कुटुंबियांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनीदेखील मदत केली. किरीट सोमय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. यानंतर शोधाशोध झाली आणि अखेर सुधाकर खाडे यांचा मृतदेह सापडला.

(Shatabdi Hospital missing corona patient found dead)

संबंधित बातम्या  

‘केईएम’मधून बेपत्ता वृद्ध कोरोनाग्रस्ताचा मृतदेह सापडला, हॉस्पिटलच्याच शवागारात 15 दिवसांनी शोध  

‘केईएम’मधून 70 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता, 10 दिवसानंतरही शोध लागेना

Published On - 10:58 am, Tue, 9 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI