AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : आंध्रप्रदेशमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली गाडी अडविली, मुंबईत अजित पवार चांगलेच संतापले

नियमानुसार संबंधित व्यक्तीला सांगण्यात आलं. पण, त्या व्यक्तीनं याबाबत व्हिडीओ व्हायरल केला, असं संस्थानचं म्हणण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा केली पाहिजे. खरचं काय घडलं, हे लोकांसमोर आलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : आंध्रप्रदेशमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली गाडी अडविली, मुंबईत अजित पवार चांगलेच संतापले
मुंबईत अजित पवार चांगलेच संतापले
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 8:19 PM
Share

मुंबई : एका शिवभक्ताच्या (Shiva Bhakta) गाडीत शिवाजी महाराजांची मूर्ती होती. तो शिवभक्त आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला जात होता. शिवाजी महाराजांची मूर्ती असल्यानं गाडीला अडविण्यात आलंय. एका व्यक्तीनं अशाप्रकारचा व्हिडीओ फेसबूकला शेअर केला. महाजारांची मूर्ती असल्यानं चेकपोस्टवर अडविण्यात आल्याचा दावा शिवभक्तानं केलाय. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना यासंदर्भात मुंबईत विचारणा करण्यात आली. त्यावेळी अजित पवार चांगलेच भडकलेत. यासंदर्भात अजित पवार म्हणाले, मिलिंद नार्वेकर हे तिरुपती देवस्थानच्या (Tirupati Devasthan) विश्वस्त मंडळात आहेत. मी त्यांच्याशी बोललो. याबाबत नार्वेकर (Milind Narvekar) निवेदन देणार आहेत. या व्हिडीओमुळं जनतेत संभ्रम निर्माण झाला. शिवाजी महाराज हे या राज्याचे दैवत आहेत. अशा बातमी सोशल मीडियावर देणं चुकीचं असल्याचं पवार यांनी सांगितलं.

विनंती करूनही अधिकाऱ्यांचा नकार

हा व्हिडीओ सुरेश पाटील नावाच्या व्यक्तीने 22 जूनला फेसबूकवर शेअर केला. व्हिडीओमध्ये पाटील म्हणतात, मी तिरुपतीहून तिरुमाला येथे जात होतो. नाक्यावर माझ्या गाडीची तपासणी झाली. त्यावेळी तपासणी करणाऱ्यांनी कारमधून शिवाजी महाराजांची मूर्ती काढण्यास सांगितलं. संबंधित अधिकाऱ्यांनी ही मूर्ती काढली नाही, तर तुम्हाला वर जाता येणार नसल्याचं सांगितलं. विनंती करूनही अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचं पाटील म्हणतात.

काय घडलं हे लोकांसमोर आलं पाहिजे

तिरुपती संस्थानच्या वतीनं याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. तिरुमाला येथे जाताना काही नियमावली आहे. त्याचं पालन केल्याचं त्यांचं म्हणण आहे. भाविकांनी त्यांच्या वाहनात मूर्ती, छायाचित्र, राजकीय पक्षाचे ध्वज घेऊन जाता येत नाही. मूर्तीपूजक प्रचार साहित्य तिरुमालाला नेण्यास मनाई आहे. नियमानुसार संबंधित व्यक्तीला सांगण्यात आलं. पण, त्या व्यक्तीनं याबाबत व्हिडीओ व्हायरल केला, असं संस्थानचं म्हणण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा केली पाहिजे. खरचं काय घडलं, हे लोकांसमोर आलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.