पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. | (Aaditya thackeray Meet Mumbai police Commissioner

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला
आदित्य ठाकरे मुंबई पोलिस आयुक्तांच्या भेटीला

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह (param bir Singh) यांची भेट घेतली आहे. मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यांनी चर्चा केली. तब्बल अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ त्यांनी पोलिस आयुक्तांबरोबर चर्चा केली. (Aaditya thackeray Meet Mumbai police Commissioner param bir Singh)

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या (Suspicious Vehicle Stolen From Vikhroli) अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गुरुवारी (25 फेब्रुवारी) रात्री स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. पोलिसांच्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले होते. आता या गाडीबाबत मोठी माहिती पुढे आली आहे. ही गाडी चोरीची असल्याची माहिती आहे. तसंच मुंबई पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागलीये. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भेटीला गेले आहेत.

जी गाडी अंबानी यांच्या बंगल्याच्या बाजूला पार्क करण्यात आली होती त्यातून कोणीही बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत नाहीय. गाडीत बसलेली व्यक्ती ही ड्रायव्हरच्या बाजूने न उतरता गाडीच्या आतूनच मागच्या सीटवर गेली आणि तिथून फुटपाथच्या बाजूला उतरल्याने सीसीटीव्हीत सदर व्यक्ती दिसू शकली नाही.

गाडी पार्क केल्यापासून सकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून त्याची पडताळणी केली जातीय. गाडीतील व्यक्ती ही मागच्या सीटवरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या फुटपाथवर उतरली आणि झुकत झुकत पुढे निघून गेल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी निर्माण होत आहे. चेहऱ्यावर मास्क आणि टोपी असल्याने सदर व्यक्तीची ओळख सापडत नसल्याची मुंबई पोलिसांची माहिती.

पोलिसांच्या हाती कोणकोणती माहिती

गाडी पार्क करणाऱ्यांचे व्हिजवल पोलिसांच्या हाती लागले आहेत. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. तोंडाला मास्क आणि टोपी असल्याने संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. तसंच गाडी मालकाची ओळख पटली असून त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.

एक महिन्यापासून गाडी वेगवेगळ्या ठिकाणी

संशयास्पदरित्या स्फोटक भरुन आलेली ही गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. 17 फेब्रुवारी 2021 रोजी मुलुंड ऐरोली येथून ही गाडी चोरी झाली होती, अशी माहिती आहे. गाडीचे मालक विक्रोळीमध्ये राहतात. त्यावेळी त्यांनी तशी तक्रारही दिली होती. तेव्हा पासून गाडी वेगवेगळ्या जागी फिरत होती. यामुळे हा कट एक महिन्यापासून रचला असावा असा पोलिसांना संशय आहे. गाडीतील सर्व वस्तूंचे नमुने एफ एस एल कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

(Aaditya thackeray Meet Mumbai police Commissioner param bir Singh)

हे ही वाचा :

LIVE | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई पोलिस आयुक्तांच्या भेटीला

Published On - 2:10 pm, Fri, 26 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI