AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कारशेडची जागा बिल्डरांच्या घशात घालणार का?’, आदित्य ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग येथील जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले आहेत. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच मेट्रो कारशेडच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

'कारशेडची जागा बिल्डरांच्या घशात घालणार का?', आदित्य ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद
| Updated on: Apr 15, 2023 | 5:54 PM
Share

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मेट्रो लाईन 6 साठी कांजूरमार्गला कारशेड बनणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी 15 हेक्टर जागा देण्यात येणार आहे. पण याच मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला. कांजूरमार्गच्या जागेतील 15 हेक्टर जागा मेट्रो 6 साठी देणार आहेत. मग उर्वरित जागा बिल्डरांच्या घशात घालायला ठेवलेली आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच मेट्रोची लाईन कल्याण डोंबिवलीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे ठाण्यात दोन कारशेड बनवण्यात येणार आहेत. त्यावरुनही आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

“महसूल खात्याने सांगितलंय की, मेट्रो लाईन 6 साठी कांजूरमार्गच्या जागेतील 15 हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत केली जावी. मला वाटतं, ही बातमी मुंबईच्या दृष्टीकोनातून फार मोठी आहे. आम्ही सातत्याने बोलत आहोत. लाईन 6 साठी कारशेड गरजेचं आहे. याबाबतचं टेंडर कारशेडविना 2018 मध्ये काढण्यात आलं. नंतर कारशेड बनवणार कुठं? हा मोठा प्रश्न होता. 2020-21 च्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कारशेड कांजूरमार्गला हलवलं होतं. लाईन 6, 3, 14, 4 या चार लाईनचे डेपो एकाच ठिकाणी करणार होतो. जनतेचे पैसे वाचावे, वेळ वाचावे यासाठी प्रयत्न सुरु होते. यातून दहा ते साडे दहा कोटी रुपये आपण महाराष्ट्राचे वाचवले असते. याशिवाय वेळ वाचवला असता”, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

‘कांजूरमार्गमध्ये मेट्रो भवन झालं असतं’

“या चारही लाईन एकत्रितपणे कांजूरमार्गला आल्या असत्या तर कांजूरमार्ग नोडल पॉईंट झालं असतं. चार-साडेचार कोटी जनतेला एका नोडल पॉईंटवर जोडलं असतं. कांजूरमार्गमध्ये मेट्रो भवन झालं असतं. सगळ्या गाड्या एकाच ठिकाणी आल्या असत्या. आम्ही जेव्हा हे पाऊल उचललं तेव्हा आरेमधील 850 एकर जागा सुरक्षित ठेवणार होतो. आरेतलं कारशेड आपण कांजूरमार्गला हलवणार होतो. मेट्रोचं काम न थांबवता हे कारशेड हलवण्याचा आपला प्रस्ताव होता. पण नंतर जो काही राजकीय गोंधळ व्हायचा होता ते झालं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘मुंबईवर राग ठेवून महाराष्ट्र भाजपने केंद्र सरकारला हाक मारली’

“मुंबईवर राग ठेवून महाराष्ट्र भाजपने केंद्र सरकारला हाक मारली आणि कोर्टात गोंधळ घातला. अक्षरश: हे काम दोन वर्ष बंद ठेवलं. मुंबईकरांना या इंटिग्रेटेड डेपोपासून वेगळं ठेवलं. मुंबईकरांचे पैसे हे उडवतील कसे यावर लक्ष ठेवलं. सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर हे या घटनाबाह्य सरकारचा हाच निर्णय होता की, मुंबईवर वार करायचा आणि कारशेड आरेला न्यायचं. त्यात ते यशस्वी ठरले आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

ठाण्याच्या दोन डेपोवरुन आदित्य ठाकरेंची टीका

“आरेमध्ये अजूनही झाडे कापण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एवढा राग तुमचा मुंबईसारखी कशासाठी आहे? मला मान्य आहे की तुम्ही मुंबई महापालिकेत घोटाळा करतात. पण हा घोटाळा खूप मोठा आहे. या प्रकरणात महाराष्ट्राचे दहा हजार कोटी रुपये वाचणार होते. एमएमआरए रिजनमधल्या मेट्रो लाईन या कल्याण डोंबिवली पर्यंत जाणार आहेत. त्यामुळे ठाण्यात दोन डेपो बनणार आहे. सध्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा यात किती हात होता ते माहिती नाही. पण आता कार डेपोंचं काय किंमतीत होणार आहे, कुणाच्या जागा घेणार आहेत, कुणाच्या सातबारे आहेत, कुणाच्या मतदारसंघात जमिनी घेणार? हे सगळे प्रश्न आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

जागा बिल्डरांच्या घशात घालणार का?

“या प्रकरणात आमचं सरकार असताना कोर्टात सुनावणी सुरु होती. पण आता ती केस बंद झाली आहे. कोर्टात याचिका दाखल करणाऱ्यांनी माघार घेतली आहे. मग ती जागा नेमकी कुणाची आहे? केंद्र सरकारची, सॉल्ट कमिश्नर, प्रायव्हेट बिल्डर, कुणाच्या मालकीची की राज्य सरकारची आहे? 15 हेक्टर देत असताना कॉम्पनसेशन करणार की नाही? केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार की नाही करणार? कारण केंद्र सरकार यामध्ये तेवढा भागीदार आहेच. आता 15 हेक्टर जागा मेट्रो 6 साठी देणार आहेत. मग उर्वरित जागा बिल्डरांच्या घशात घालायला ठेवलेली आहे का? की नक्की काय होणार आहे? यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. कारण मुंबई, महाराष्ट्राचे पैसे उधळपट्टी केली जातेय”, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....