AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाड पडताच पालिका अधिकाऱ्याने टॉयलेटमध्ये फेकले नोटांचे बंडल, प्रत्येक गटार शोधून नोटा मिळवल्याच; नंतर काय घडलं?

मुंबईत लाचखोरीचं एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याला या प्रकरणात अटक केली आहे. एका हॉटेलचालकाकडून त्याने लाच मागितली होती. रक्कमही ठरली. हातात रक्कमही आली. पण त्याचवेळी लाचलूचतप प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आले आणि...

धाड पडताच पालिका अधिकाऱ्याने टॉयलेटमध्ये फेकले नोटांचे बंडल, प्रत्येक गटार शोधून नोटा मिळवल्याच; नंतर काय घडलं?
ACBImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2024 | 9:42 PM
Share

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक अत्यंत वेगळी आणि धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई महापालिकेचा एक अधिकारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रडारवर आला. त्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्याने या पालिकेच्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्याचा निर्णय घेतला. पण हा अधिकारीही हुश्शार निघाला. आपल्यावर जाळं टाकण्यात आल्याचं त्याच्या लक्षात आलं. ही गोष्ट लक्षात येताच त्याने लाच म्हणून स्वीकारलेली रक्कम थेट टॉयलेटमध्येच टाकून दिली. एसीबीचे अधिकारीही बहद्दार निघाले. त्यांनी परिसरातील प्रत्येक गटर शोधून काढली आणि एक एक नोट जप्त केली.

बोरिवलीतील एका रेस्टॉरंटला पाईप नॅचरल गॅसचं कनेक्शन हवं होतं. त्यासाठी हॉटेल मालकाने एका कंपनीला हायर केलं. पण हे कनेक्शन बसवण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज होती. पालिकेची एनओसी हवी होती. त्यामुळे एका व्यक्तीने या कनेक्शनसाठी ऑनलाईन अप्लाय केला. पण ऑनलाइन अप्लाय करूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने या व्यक्तीने पालिकेचे वरिष्ठ फायर ऑफिसर प्रल्हाद शितोळे यांच्याशी संपर्क साधला. शितोळे यांचं कार्यालय दहिसर परिसरातील लिंक रोडवर आहे. याच इमारतीत शितोळे यांचं ऑफिस आहे आणि चौथ्या मजल्यावर त्यांचं घरही आहे.

दीड लाखाची लाच मागितली

पीडीत व्यक्तीच्या मतानुसार, शितोळे यांनी साईटची पाहणी केली. तसेच लाच म्हणून दीड लाख रुपयांची मागणी केली. पीडित व्यक्तीने लाच देण्यास नकार दिला. पण त्यानंतर कमी जास्त करून लाचची रक्कम 60 हजार रुपये ठरवण्यात आली. पीडित व्यक्तीने थेट एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी जाळं पसरवण्यास सुरुवात केली. एसीबीने पीडित व्यक्तीला नोटांची बंडलं दिली. त्यावर खूण करण्यात आली होती. या नोटा घेऊन पीडित व्यक्ती अधिकाऱ्याकडे गेला. त्याला नोटा दिल्या. पण त्या नोटा पाहून अधिकाऱ्याला संशय आला. त्याने लगेच त्या नोटा त्याच्या कार्यालयाच्या टॉयलेटमध्ये टाकल्या आणि फ्लशचं बटन दाबलं.

20 गटारांमध्ये शोधाशोध

त्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांनी शितोळे याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने 60 हजार रुपये टॉयलेटमध्ये टाकल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी या नोटा मिळवण्यासाठी एक दोन नव्हे तर 20 गटार उघडे केले. त्यात नोटांची शोधाशोध सुरू केली. यावेळी अधिकाऱ्यांना 57 हजार रुपये गटारात सापडले आहेत. अजून तीन हजार रुपये अधिकाऱ्यांना सापडलेच नाहीत. पुरावा म्हणून अधिकाऱ्यांनी या नोटा जप्त केल्या आहेत. तसेच शितोळेंचे शर्ट, बाथरूमचे लॉक आणि मेन डोअरमधून फिनोलफथेलिन पावडर जप्त केली आहे. ही पावडर नोटांवरही लावण्यात आली होती.

Follow Us
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...