‘हा माणूस बेभरवशाचा, त्याला आमच्याकडे कुत्र सुद्धा विचारत नाही’, मंगेश चव्हाण यांची उन्मेष पाटलांवर खोचक टीका

"आमच्या मतदारसंघात या माणसाला कुत्र सुद्धा विचारत नाही ही परिस्थिती आहे. गाईला आई मानन्याची आमची संस्कृती आहे. आईच्या गायीच्या दुधात पैसे चोरणारी आम्ही औलाद नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्या उन्मेष पाटील यांनी गायीची भाड खाल्ली", असा घणाघात मंगेश चव्हाण यांनी केला.

'हा माणूस बेभरवशाचा, त्याला आमच्याकडे कुत्र सुद्धा विचारत नाही', मंगेश चव्हाण यांची उन्मेष पाटलांवर खोचक टीका
मंगेश चव्हाण यांची उन्मेष पाटलांवर खोचक टीका
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 9:23 PM

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “उन्मेष पाटील म्हणजे पेपर फोडून पास होणारा हा पोरगा आहे. एखाद्या विषयाची माहिती घ्यायची आणि त्या माहितीच्या आधारे श्रेय लाटायचं. माझ्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळालं, असं म्हणायलाही हा माणूस कमी करणार नाही हा एकदम निर्लज्ज माणूस आहे. 10 वर्षात त्यांना गाय दिसली नाही, शेतकरी दिसला नाही आणि दूध दिसलं नाही. त्यांना कळालं की आता अडचणीतला दूध संघ त्यांनी नफ्यात आणला. शेतकऱ्यांचे उदो उदो करतील म्हणून श्रेय घेण्यासाठी त्यांनी केलं”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.

“आमच्या मतदारसंघात या माणसाला कुत्र सुद्धा विचारत नाही ही परिस्थिती आहे. गाईला आई मानन्याची आमची संस्कृती आहे. आईच्या गायीच्या दुधात पैसे चोरणारी आम्ही औलाद नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्या उन्मेष पाटील यांनी गायीची भाड खाल्ली. चाळीसगावला कत्तलखाना उभारायला त्याला सर्व परवानगी याने दिल्या. त्याने पैसे कसे घेतले, किती घेतले, हे सर्व मी तुम्हाला कागदपत्रांशी पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकवू नये”, अशा इशारा मंगेश चव्हाण यांनी दिला.

‘हा माणूस बेभरवशाचा’

“उन्मेष पाटील यांना आता शेतकरी आठवतो आहे का? त्यांच्या काळात पूर आले तेव्हा शेतकरी दिसला नाही. कोरोनामध्ये जेव्हा लोक मरत होती तेव्हा या माणसाने कंपन्या चालू केल्या. हा माणूस सोयीचं राजकारण करतो. कधी गिरनेच्या नावाने, कधी नारपारच्या नावाने. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हा माणूस बेभरवशाचा आहे. त्याला आमच्याकडे कुत्र सुद्धा विचारत नाही”, असा घणाघात मंगेश चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्यावर केली.

‘त्यांची निष्ठा किती आहे?’, मंगेश चव्हाण यांचा खडसेंना सवाल

यावेळी मंगेश चव्हाण यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही प्रतिक्रिया दिली. “तीन वर्षात चारदा पक्ष सोडणे आणि पक्ष बदलणारा माणूस किती मोठा असू शकतो. प्रवेश कुठे झाला, काय झाला, याबाबत आम्हाला तर वरिष्ठांनी काही सूचना दिल्या नाहीत. त्यांच्यावर बोलण्या इतपत एवढा मोठा माणूस मी नाही. त्यांची निष्ठा किती आहे? तीन वर्षात चार वेळा पक्ष सोडणे आणि पक्ष बदलवणारा माणूस, किती मोठा असू शकतो त्यावर मी काय बोलू?”, अशी प्रतिक्रिया मंगेश चव्हाण यांनी दिली.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.