Aditya Thackarey : इलेक्ट्रीक वाहनांबाबत शॅले हॉटेल्सचा पुढाकार कौतुकास्पद, इतर आस्थापनांनी देखील वापर करावा : आदित्य ठाकरे

इलेक्ट्रीक वाहनांबाबत आखलेल्या धोरणांची शॅलेचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी यांनी ठाकरे यांना आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत माहिती दिली. शॅले 2025 पर्यंत आपली सर्व वाहने इलेक्ट्रीक वाहने करणार आहे. 2029 पर्यंत ऊर्जा उत्पादन दुप्पट करणार आहे.

Aditya Thackarey : इलेक्ट्रीक वाहनांबाबत शॅले हॉटेल्सचा पुढाकार कौतुकास्पद, इतर आस्थापनांनी देखील वापर करावा : आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 2:11 AM

मुंबई : राज्य शासनाने इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केल्यानंतर मोठ्या हॉटेल्सनी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रीक वाहने वापरावीत, असे आवाहन केले आहे. यास प्रतिसाद देत शॅले हॉटेल्सने घेतलेल्या पुढाकाराचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे. इतर आस्थापनांनी देखील इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

शासनाच्या पर्यावरणासाठीच्या धोरणाचे नुकत्याच ग्लासगो येथे झालेल्या Cop26 या आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषदेत पुरस्कार देऊन कौतुक केले गेले. त्याची माहिती देऊन ठाकरे म्हणाले, सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण पूरक सवयी अंगिकारणे ही पृथ्वीसाठीच नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.

शॅले 2025 पर्यंत आपली सर्व वाहने इलेक्ट्रीक वाहने करणार

शॅले हॉटेल्स मार्फत मुंबई आणि पुण्यात हॉटेल्स चालविली जातात. इलेक्ट्रीक वाहनांबाबत आखलेल्या धोरणांची शॅलेचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी यांनी ठाकरे यांना आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत माहिती दिली. शॅले 2025 पर्यंत आपली सर्व वाहने इलेक्ट्रीक वाहने करणार आहे. 2029 पर्यंत ऊर्जा उत्पादन दुप्पट करणार आहे. तर, 2031 पर्यंत पूर्णतः नविनीकृत ऊर्जेचा वापर सुरू होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याबरोबरच रियुज, रिड्युस आणि रिसायकल या तत्वानुसार ऊर्जा, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक वाहने वापरण्यात येणार

राज्याच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाविषयी माहिती देऊन मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक वाहने वापरण्यात येणार असल्याचे यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितले. पुढील वर्षापासून शासनामार्फत खरेदी केली जाणारी वाहनेसुद्धा इलेक्ट्रीक वाहने असतील. मुंबईत बेस्टच्या ताफ्यातील 2100 इलेक्ट्रीक बस खरेदीसाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे ते म्हणाले. आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. आता मोठ्या हॉटेल्सनी इलेक्ट्रीक वाहने वापरावीत या आवाहनाला प्रतिसाद देऊन शॅले हॉटेल्सने आखलेल्या या उपक्रमाचे ठाकरे यांनी कौतुक केले. (Aditya Thackeray’s appeal to use electric vehicles for environment)

इतर बातम्या 

MHADA Examination : पेपर फुटीनंतर आता म्हाडा परीक्षेची नवी तारीख जाहीर, कधी होणार परीक्षा?

पेपर फुटी प्रकरणात सरकारची मोठी कारवाई, राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.