धनंजय मुंडे समर्थक सहकुटुंब मुंबईत, चित्रकूट बंगल्यावर पुन्हा गर्दी

धनंजय मुंढे यांचे शासकीय निवसस्थान चित्रकूट या बंगल्यासमोर त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढली आहे. (Renu Sharma Dhananjay Munde)

  • विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:14 PM, 16 Jan 2021
धनंजय मुंडे समर्थक सहकुटुंब मुंबईत, चित्रकूट बंगल्यावर पुन्हा गर्दी

मुंबई : समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्यावर फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. धनंजय मुंढे यांचे शासकीय निवसस्थान चित्रकूट या बंगल्यासमोर त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढली आहे. ते आपल्या कुटुंबासोबत येऊन धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी चित्रकूट बंगल्यासमोर गर्दी करत आहेत. (After allegation made on Renu Sharma supporters of Dhananjay Munde gathering in front of his bungalow)

धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची गर्दी का वाढली?

गायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मागील काही दिवसांपूर्वी बलात्काराचे आरोप केले आहेत. रेणू शर्मा यांच्या आरोपानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली होती. मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, त्यानंतर रेणू शर्मा यांनी अनेकांना फसवल्याची चर्चा सुरु झाली. भाजप नेते कृष्णा हेगडे, मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी या तिघांनी रेणू शर्मा यांनी जवळीक साधत फसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शुक्रवारी केला. या आरोपानंतर धनंजय मुंडे यांना जाहीरपणे समर्थन केलंज जाऊ लागलं आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादीनेही धनंजय मुंडे यांचे समर्थन करत पूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची त्यांच्या घरासमोर गर्दी वाढली असून त्यांच्या मनात आनंदाची भावना निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीकडून मोठा दिलासा

मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानतंर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली होती. मात्र त्यानंतर रेणू शर्मा यांनी अनेकांना फसवल्याचे आरोप होत आहेत. याच गोष्टीची दखल घेत राष्ट्रवादीनेही धनंजयच मुंडे यांची पाठराखण केली. रेणू शर्मा यांच्याविरोधात झालेल्या ब्लॅकमेलिंगच्या तक्रारीची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा घेण्यास नकार देत, सत्य बाहेर येईपर्यंत वाट पाहण्याचा पवित्रा घेतला.

मनिष धुरी दारू पिऊन मला कॉल करायचे : रेणू शर्मा

दरम्यान, रेणू शर्मा यांच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करणारे मनसे नेते मनिष धुरी यांच्याबाबत रेणू शर्मा यांनी आज (16 जानेवारी) मोठा खुलासा केला. “मी मनिष धुरी यांना माझ्या अल्बमच्या कामासंदर्भात भेटली होती. त्यानंतर ते मला दारु पिऊन कॉल करायचे. ब्लॅकमेल हा शब्द घेवून माझ्यावर आरोप केले जात आहेत. हे सर्व आरोप चुकीचे आहेत,” असं रेणू शर्मा यांनी म्हटलंय. तसेच तक्रार केल्यानंतर धमकीचे अनेक फोन येत असून यंत्रणेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, आता माजी आमदाराचा आरोप

तिने माझ्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला; मनसेच्या मनीष धुरींची रेणू शर्मांविरोधात पोलिसांत तक्रार

(After allegation made on Renu Sharma supporters of Dhananjay Munde gathering in front of his bungalow)