रेणू शर्मा लवकरच माध्यमांशी बोलणार, धनंजय मुंडे प्रकरणासह बडे खुलासे करण्याची शक्यता

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिला रेणू शर्मा आज (15 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधणार आहेत. (Renu sharma Ddhananjay Munde)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:38 PM, 15 Jan 2021
रेणू शर्मा लवकरच माध्यमांशी बोलणार, धनंजय मुंडे प्रकरणासह बडे खुलासे करण्याची शक्यता

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिला रेणू शर्मा (Renu sharma) आज (15 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ठीक तीन वाजता त्या माध्यमांसमोर येतील. यावेळी त्या धनंजय मुंडे यांच्यावर केलेले बलात्काराचे आरोप आणि त्यांच्याविरोधातील तक्रार यावर बोलणार आहेत. यावेळी त्यांच्यावर केलेल्या हनी ट्रॅपच्या आरोपावरही त्या बोलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांच्यासोबत त्यांचे वकील अ‌ॅड. रेमेश त्रिपाठी (Ramesh Tripathi) उपस्थित असतील. (Renu sharma along with her advocate Ramesh Tripathi will brief the media)

गायिका रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आरोपानंतर मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. तर दुसरीकडे रेणू शर्मा यांनी आम्हालाही फसवल्याचा आरोप करत भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनिष धुरी यांनी केलाय. त्यांच्या या आरोपांनतर रेणू शर्मा यांनी अनेकांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप होतोय. याच कराणामुळे आपली बाजू मांडण्यासाठी त्या माध्यमांसमोर येणार असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी हे उपस्थित असतील.

रेणू शर्मा यांच्यावर कोणते आरोप?

रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असा दावा कृष्णा हेगडे यांनी केलाय.

“मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी,” असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले होते. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले होते.

मनीष धुरींनी काय आरोप केला?

मनसेचे नेते मनीष धुरी यांनी रेणू शर्मा यांनी त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप केला. त्यांनी रेणू शर्मांच्या विरोधात पोलिसांत लेखी तक्रार दिलीय. वर्ष 2008 साली मनसे विभाग अध्यक्ष आणि चित्रपट सेना उपाध्यक्ष असताना मनीष धुरी यांनी त्यावेळी रेणू शर्मा या त्यांच्या संपर्कात आल्याचं सांगितलंय. म्युझिक अल्बम तयार करण्यासाठी मदत करा म्हणून त्या संपर्कात आल्याचा खुलासा मनीष धुरी यांनी केलाय. ”ती एकदा मला आपल्या दीदीला भेटण्यासाठी घरी घेऊन गेली होती, पण घरी ती एकटीच असून, अश्लील चाळे करायला सुरुवात केली. परंतु मी यातून कसा तरी बाहेर निघालो, त्यामुळे मी वाचलो”, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या सर्व आरोपांनंतर रेणू शर्मा या 3 वाजता माध्यमांशी बोलणार आहेत. यावेळी त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, आता माजी आमदाराचा आरोप

तिने माझ्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला; मनसेच्या मनीष धुरींची रेणू शर्मांविरोधात पोलिसांत तक्रार

(Renu sharma along with her advocate Ramesh Tripathi will brief the media)