Munawar Faruqui: भाजप सरकारनं शो कॅन्सल केला, आता मुनव्वर फारुकीचा शो काँग्रेस मुंबईत करणार?

गेल्या दोन महिन्यात त्याचे 12 शो रद्द झाले आहेत. आता काँग्रेसने मुनव्वरला मुंबईत कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. काँग्रेसचे अँथनी मॅथ्यू म्हणाले की मुनवरचा प्रस्तावित कार्यक्रम मुंबईत शांततेत पार पडावा यासाठी ते पोलीसांसोबत कायदा व सुव्यवस्थेसाठी काम करतील.

Munawar Faruqui: भाजप सरकारनं शो कॅन्सल केला, आता मुनव्वर फारुकीचा शो काँग्रेस मुंबईत करणार?
Munawar Faruqui

मुंबईः कॉमेडियन मुनव्वर फारोकीचा (Munawar Farooqui) शो बेंगळुरूमध्ये रद्द झाल्यानंतर, काँग्रेस पक्षाने (Congress) मुनव्वरला मुंबईत शो (Show in Mumbai) करण्यासाठी आमंत्रित केले आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे नेते अँथनी मॅथ्यूज म्हणाले की, आम्ही मुनावरशी चर्चा करत आहोत आणि त्यानी पुष्टी केल्यावर अधिकृतपणे तारीख घोषीत करू. मुनावर हा मूळचा मुंबईचा आहे आणि तो भारतभर त्याचे स्टँड-अप कॉमेडी शो करतो. 28 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमधील मुनव्वरचा शो शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला कारण शो आयोजित केलेल्या ठिकाणी तोडफोड करण्याची धमक्या देण्यात आल्या होत्या.

गेल्या दोन महिन्यात त्याचे 12 शो रद्द झाले आहेत. त्याला उजव्या विचारसरणीच्या गटांकडून धमक्या येत आहेत. बंगळुरू पोलिसांनी कॉमेडियन मुनावर फारुकीच्या शोच्या आयोजकांना कार्यक्रम रद्द करण्यास सांगितल्यानंतर, त्याने सोशल मीडियावर लिहिले की, मी हरलो आहे आणि मी भविष्यात कदाचीत शो करणार नाही. त्यानंतर देशभरात याविषई चर्चा सुरू झाल्या.

तृणमूलनंतर आता काँग्रेसचा मुनावरला पाठिंबा

प्रथम तृणमूल काँग्रेसने मुनीवरला पाठींबा दिला आणि तृणमूलचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी त्याला पश्चिम बंगालमध्ये कार्यक्रम करण्यासाठी जाहीर आमंत्रण दिले. ट्विट करत त्यांनी म्हटलं की पश्चिम बंगालमध्ये भाजपसत्ता असलेल्या राज्यांसारखी परिस्थिती नाही आणि कोण्ही भाजप किंवा आर एस एस चे कार्यकर्ते कोणालाही धमकावू शकत नाही. आता काँग्रेसने मुनावरला मुंबईत कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. काँग्रेसचे अँथनी मॅथ्यू म्हणाले की मुनवरचा प्रस्तावित कार्यक्रम मुंबईत शांततेत पार पडावा यासाठी ते पोलीसांसोबत कायदा व सुव्यवस्थेसाठी काम करतील. ते पुढे म्हणाले की, “मुनावरला संविधानाने दिलेल्या अधिकारांचा लाभ घेण्यासाठी काँग्रेस मदत करेल.”

कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या एका शोमध्ये “हिंदू देव-देवतांचा अपमान” केल्याच्या आरोपाखाली एक महिना तुरुंगात घालवला आहे. इंदोरमध्ये चालू असण्याऱ्या त्याचा शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी धडक स्टेजवर जाऊन आरोप केले आणि मुनवारवार पोलीस कारवाई करण्यात आली. मात्र, त्या शोमध्ये त्यानी हिंदू देवांचा अपमान करणारे एकही वाक्य वापरले नव्हते. जवळपास 35 दिवस जेलमध्ये घालवल्यानंतर त्याला सोडण्यात आले.

इतर बातम्या

मोठी बातमीः राज्यात संरक्षण आणि आरोग्य विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटले

अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले, पोलिसांना सूचना गेल्या ‘हे होऊ द्या’; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप


Published On - 2:14 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI