AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांना आज शिवाजी महाराज आठवले…राज ठाकरे यांचा टोला

raj thackeray | मनसेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शाखा अध्यक्षांपर्यंत बैठक झाल्या आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी या ठिकाणी बैठक झाल्या आहेत.लोकसभा आणि विधासभेच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू आहे. परंतु आजच्या राजकारणात सर्व ठिकाणी चिखल झाला आहे.

शरद पवार यांना आज शिवाजी महाराज आठवले...राज ठाकरे यांचा टोला
राज ठाकरे
| Updated on: Feb 24, 2024 | 1:37 PM
Share

मुंबई, दि. 24 फेब्रुवारी 2024 | शरद पवार यांनी आतापर्यंत कधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही. आता त्यांना छत्रपती आठवत आहेत. शरद पवार यांना आज रायगडाची आठवण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतल्यामुळे मुसलमानाची मते जातात, असे त्यांना वाटत होते. शरद पवार यांची मुलाखत मी मागे घेतली होती. त्यावेळी त्यांना विचारले होते की, तुम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. कधी शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाही, असा मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले. शरद पवार यांना निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले. या चिन्हाचे रायगडावरुन अनावरण करण्यात आले. त्यासंदर्भात राज ठाकरे बोलत होते. शरद पवार यांना तुतारी चिन्ह मिळाले मग काय करायचे. तुतारी फुंका, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.

निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका

आमच्या शाखा अध्यक्षांपर्यंत बैठक झाल्या आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी या ठिकाणी बैठक झाल्या आहेत. लोकसभा आणि विधासभेच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू आहे. परंतु आजच्या राजकारणात सर्व ठिकाणी चिखल झाला आहे. मागे एका कार्यक्रमात गेलो तेव्हा कोण कुठल्या पक्षाचा आहे हे कळाले नाही. कारण कधी कोण अजित पवार गटात असतात तर कधी शरद पवार गटात असतात.

मराठा आरक्षणावर तसेच झाले ना

मराठा आरक्षणावर मी बोललो होतो. आता तसेच झाले ना? मी जे बोलतो ते तुम्हाला नंतर पटते. माझ्या काळ्या केसांवर जाऊ नका, असा टोला राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणातील चाणक्यांना लगावला. आता मतदारांनी या लोकांना धडा शिकवला पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहिल्यावर महाराष्ट्र २०१९ नंतर जे होत आहे ते योग्य नाही. यामुळे नवीन युवक राजकारणमध्ये येणार नाही. कुणासोबत व्यासपीठावर गेलो म्हणजे युती होत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

निवडणूक ईव्हीएमवर घेण्याबाबत राज ठाकरे यांनी विरोधी सूर व्यक्त केला. जगभरात पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे. परंतु आपण ईव्हीएमवर मतदान घेत आहे. ईव्हीएमवर मतदान झाले की नाही? हे ही कळत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.