देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेट्रो कमेंट’ला अजित पवारांचं खास ‘दादा स्टाईल’ने उत्तर

मेट्रोच्या कामासाठी राज्याच्या हिश्शाचा पूर्ण निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Devendra Fadnavis tweet)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:00 PM, 28 Jan 2021
देवेंद्र फडणवीस यांच्या 'मेट्रो कमेंट'ला अजित पवारांचं खास 'दादा स्टाईल'ने उत्तर
अजित पवार

मुंबई : “राज्यात मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरात मेट्रोचे काम सुरु आहे. हे सर्व काम आम्ही तडीस नेत आहोत. मेट्रोच्या कामासाठी राज्याच्या हिश्शाचा पूर्ण निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधानसभेचे विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा प्रश्न आहे,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (Ajit Pawar comment on Devendra Fadnavis tweet on metro)

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील मेट्रोमधून प्रवास करतानाचे फोटो ट्विट केले आहेत. तसेच त्यांनी या ट्विटरमध्ये ‘मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन?,’ असा सवाल करत महाविकास आघाडीला चिमटा काढला होता. फडणवीसांच्या याच ट्विटला उत्तर देताना अजित पवार यांनी वरील वक्तव्य केले.

निधी कमी पडू देणार नाही

राज्यात पुणे, मुंबई, नागपूर अशा शहरांमध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. या कामात कुठं काय अडचण आली?, काम कसं चालू आहे?, ठरल्याप्रमाणे काम होत आहे की नाही,? या सर्व गोष्टींचा आढावा मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतो. आयोजित केलेल्या बैठकांना सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित असतात. मेट्रोच्या कामासाठी राज्य सरकारकडून निधी कमी पडणार नाही, याची सरकारकडून काळजी घेतली जाते, असे अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचे ट्विट काय?

“मी आज दिल्ली विमानतळावर परत येताना मेट्रो रेल्वेने प्रवास केला. नेहमीच्या रस्ते मार्गापेक्षा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत झाला. मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन? महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळ पाहता त्याची शाश्वती वाटत नाही, असे फडणवीसांनी ट्विट केले होते.

ही तर विनाशकाले विपरीत बुद्धी

भाजपच्या वेबसाईटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नावासमोर संतापजनक आणि अपमानकारक शब्दात वर्णन करण्यात आले होते. हा प्रकार खडल्यानंतर भाजपवर टीका होत होती. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा कडक इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता. त्यांनतर भाजपच्या वेबसाईटवरून अपमानजनक शब्द हटवले गेले होते. यावर बोलताना भाजप खासदार यांच्या रक्षा खडसे यांच्या नावासमोर अपमानजनक शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. हे जर कोणी जाणीवपूर्वक केलं असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असं अजित पवार म्हणाले. तसेच, या प्रकरणावर बोलताना, हा प्रकार म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावे लागेल, अशी खोचक टिप्पणीसुद्धा अजित पवार यांनी केली.

संबंधित बातम्या : 

ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस

मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

(Ajit Pawar comment on Devendra Fadnavis tweet on metro)