भाजपच्या पुण्यातील 19 नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांच्या सुरात सूर

अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील भाजपच्या नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, मराठा आरक्षण, याबद्दल भूमिका मांडली. (Ajit Pawar BJP NCP)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:57 PM, 21 Jan 2021
भाजपच्या पुण्यातील 19 नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांच्या सुरात सूर
अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील भाजपच्या नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, केंद्राकडून येणारे पैसे याबद्दल भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अजित पवारांनी याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. उद्या पुण्याला जाणार आहे. सध्या पक्षांतर बंदी कायदा आहे. पक्ष सोडल्यास त्यांचं नगरसेवकपद रद्द होईल. भाजपच्या नगरसेवकांचं पक्षांतर ही ऐकीव माहिती आहे. काही मिळालं नाही की माध्यमं अशा बातम्या पसरवात, असं अजित पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नगरसेवकांच्या पक्षांतरांच्या चर्चांविषयी विचारलं असता मांध्यमांना सुनावलं होतं. (Ajit Pawar denied discussion of 19 BJP Corporator of Pune join NCP )

मराठा आरक्षण टिकवण्याासाठी सरकार काम करतंय

महाविकास आघाडी सरकार सुरुवातीपासून मराठा आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. एखादं प्रकरण सुप्रीम कोर्टात असते त्यावेळी निकाल काय लागतो, याची वाट पाहावी लागते. मराठा समाजातील युवकांनी आत्महत्येसारख्या मार्गानं जाऊ नये, असं अजित पवार म्हणाले. एमपीएससी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरही अजित पवारांनी मत मांडले. एमपीएससीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला नको होती. राज्यातील विविध अडचणींवर आम्ही योग्य मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चांगलं काम

राज्यातील जनतेला समोर ठेवून, सर्व जाती धर्माच्या नागरिकांवर अन्याय होणार नाही, असं काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गानं हे राज्य चालतं, आम्ही त्यांच्या मार्गानं जाणारे आहोत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सुरु आह, असंही अजित पवार म्हणाले.

वाढीव वीज बिलाचा मद्दा

मी फाईल पेडिंग ठेवणारा माणूस नाही. मोठे निर्णय एक मंत्री घेत नसतो, संपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेत असते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची तिजोरी पाहता सगळ्या गोष्टींचा विचार करुन निर्णय घ्यावे लागतात.  आर्थिक परिस्थिती आणि कोरोनाचा विचार करुन पावलं उचलावं लागतात. केंद्राकडून आमचे 25 हजार कोटी रुपये येणे आहे. ते अजून आले नाहीत.

संबंधित बातम्या :

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार : खा. बापट

पुण्यात 19 नगरसेवक भाजपा सोडणार? वाचा काय म्हणतायत गिरीश बापट

Ajit Pawar denied discussion of 19 BJP Corporator of Pune join NCP