पुण्यात 19 नगरसेवक भाजपा सोडणार? वाचा काय म्हणतायत गिरीश बापट

मागील महापालिका निवडणुकीत (Pune municipal corporation) पुण्यात भाजपला (BJP) मोठं यश मिळालं होतं.

  • अश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 11:54 AM, 20 Jan 2021
पुण्यात 19 नगरसेवक भाजपा सोडणार? वाचा काय म्हणतायत गिरीश बापट
गिरीश बापट

पुणे : पुणे शहरातील 19 नगरसेवक (Pune BJP Corporators) भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत (Pune municipal corporation) पुण्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेतून मोठी इनकमिंग भाजपात झाली होती. मात्र यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. (BJP MP Girish Bapat explanation on Rumors of BJP corporators leaving the party)

मात्र या चर्चेचा भाजप खासदार गिरीश बापट यांनी इन्कार केला आहे. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा गिरीश बापट यांनी केला. इतकंच नाही तर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही या चर्चेचं खंडण केलं आहे.

मुळीक म्हणाले, “नगरसेवक भाजपमध्ये नाराज असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. आमचा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही. कुणीतरी मुद्दामहून ही बातमी पेरली आहे. ज्यामध्ये काहीही तथ्य नाही”.

गिरीश बापट नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांचा दावा

भाजप नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा केवळ मीडियातच आहेत. काहीतरी पुड्या सोडत असतात, चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. कोणीही भाजप सोडून जात नाही, उलट पुढील काही दिवसात आमच्याकडे काही लोक येणार आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता

सध्या पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीला चीत करुन भाजपने पुणे महापालिकेची सत्ता मिळवली होती. अजित पवारांच्या पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता गेल्याने उलटसुलट चर्चाही झाल्या. अजित पवारांनीही पुणे महापालिका हातातून गेल्याची खंत अनेक वेळा बोलून दाखवली होती.

गिरीश बापटांची भविष्यवाणी

“पुण्यात भाजपचे नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. भाजपच्या सत्ताकाळात पुण्यात विकास होत आहे. त्यामुळे येत्या 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा घौडदौड करेल. भाजपने लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळला असल्याने पुण्यात भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील, अशी भविष्यवाणी भाजप खासदार गिरीश बापट यांनी गेल्याच महिन्यात केली होती.

पुणे महापालिकेची निवडणूक 2022 ला होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासून तयारीला लागलेले दिसत आहे.

संबंधित बातम्या  

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार : खा. बापट

(BJP MP Girish Bapat explanation on Rumors of BJP corporators leaving the party)