पुणे पालिकेवर काँग्रेसचा झेंडा कसा फडकणार? वाचा बैठकीत काय घडलं?

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचाच, असा निर्धार काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांनी केला आहे.

पुणे पालिकेवर काँग्रेसचा झेंडा कसा फडकणार? वाचा बैठकीत काय घडलं?
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 9:00 AM

पुणे :  आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत (Pune Mahanagarpalika Election) कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर काँग्रेसचा (Congress) झेंडा फडकवायचाच, असा निर्धार काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांनी केला आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी सोबत लढो किंवा न लढो परंतु या निवडणुकीत महापालिकेवर काँग्रेसचा झेंडाच फडकला पाहिजे, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. (Congress meeting Over pune mahapalika Election)

पुणे महापालिकेसाठी 2022 मध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी जवळपास दीड ते दोन वर्ष वेळ आहे. परंतु पुणे शहर काँग्रेसने आतापासूनच या निवडणुकीची रणनिती आखायला सुरुवात केली आहे.

पुणे शहर काँग्रेसची गुरुवारी एक विशेष बैठक पार पाडली. या बैठकीत 2022 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीविषयी सखोल चर्चा झाली. जर 2022 ला पुणे महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा असेल तर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिले आहेत.

शहर काँग्रेसच्या महापालिका निवडणूक रणनितीच्या विशेष बैठकीला शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेविका कमला व्यवहारे तसंच अरविंद शिंदे आणि महत्त्वाचे काँग्रेस कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीला चीत करुन भाजपने पुणे महापालिकेची सत्ता मिळवली होती. अजित पवारांच्या पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता गेल्याने उलटसुलट चर्चाही झाल्या. अजित पवारांनीही पुणे महापालिका हातातून गेल्याची खंत अनेक वेळा बोलून दाखवली. अशा सगळ्या वातावरणात पुणे महापालिकेत जर काँग्रेसला अच्छे दिन पाहायचे असतील तर त्यासाठी आतापासूनच कामाला लागले पाहिजे, असे आदेशच बागवे यांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, शहर काँग्रेस लवकरच प्रभागनिहाय बैठका घेणार आहे. या बैठकांमधून दिला जाणारा मतदार गावभेटींचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहनही बागवे यांनी केले आहे. (Congress meeting Over pune mahapalika Election)

हे ही वाचा :

Pune new 23 villages: पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांची यादी

नवीन वर्षात काय? मोदी देश सांभाळतील तर लोकांनी कुटुंब सांभाळावे, राऊतांची टोलेबाजी

ईडी येताच खडसे ‘सीडी’वर नंतर बोलणार?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.