AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या बजेटमधून गाव गाड्यासाठी काय मिळालं, वाचा 10 मोठ्या घोषणा

आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी प्रधान असल्याचं लक्षात घेऊन अजित पवार यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी विविध घोषणा केल्या आहेत.

Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या बजेटमधून गाव गाड्यासाठी काय मिळालं, वाचा 10 मोठ्या घोषणा
बजेटमधील चौथे सूत्रImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 4:55 PM
Share

मुंबई :  महाराष्ट्राचा (Maharashtra) 2022-23 चा अर्थसंकल्प (Budget) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित होते. आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी प्रधान असल्याचं लक्षात घेऊन अजित पवार यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी विविध घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे, असं म्हटलं. गेल्या दोन वर्षांपासून आपत्तींना तोंड देत राज्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहोत. जे जे करण्यासारखं शक्य आहे ते  करत आहोत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्यातील जनतेचा, भगिनींचा विकास करणारा हा अर्थसंकल्प आहे. जनता देखील या अर्थ संकल्पाचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

गावगाड्यासाठी 10 मोठ्या घोषणा

  1. नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. भूविकास बँकेच्या 34 हजार 788 शेतकऱ्यांचे 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रुपयांची देणी देण्यात येणार आहेत.
  2. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करण्यात येणार अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करुन 75 हजार रुपये करण्यात आलं.
  3. देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.
  4. 1 लाख 20 हजार अंगणावाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा देण्यात येणार आहेत. बालसंगोपण अनुदानात 1125 रुपयांवरुन 2500 पर्यंत वाढ करण्यात आली.
  5. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 अंतर्गत 10 हजार कि.मी. लांबीच्या रस्त्याकरिता 7500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.6650 कि.मी लांबीच्या पंतप्रधान ग्रामस सडक योजना टप्पा 3 चा प्रारंभ करण्यात आला.
  6. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वंयरोजगार सुरु करण्यासाठी 100 टक्के व्याज परताव्याची पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे.
  7. कौडगाव, शिंदाळा जिल्हा लातूर, साक्री जिल्हा धुळे, वाशिम, कचराळा जिल्हा चंद्रपूर आणि यवतमाळ येथे 577 मेगावॅट क्षमेतेचे सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.2500 मेगावॅट क्षमतेचे नवीन सौर ऊर्जा पार्क निर्माण करण्यात येणार आहे.
  8. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील 5 लाख घरकुल बांधणीसाठी 6 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
  9. कोयना, जायकवाडी आणि गोसीखूर्द येथे जल पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत.
  10. जव्हार जिल्हा पालघर, फर्दापूर जिल्हा औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ, महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरिता सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
  11. महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक, मोदींच्या कालच्या वक्तव्यानंतर घडमोडींना वेग

Maharashtra Budget 2022: तू प्रारंभ यशवंत महाराष्ट्राचा, अजित पवारांच्या बजेटमधल्या 10 मोठ्या घोषणा वाचल्यात का?

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.