Maharashtra Budget 2022: तू प्रारंभ यशवंत महाराष्ट्राचा, अजित पवारांच्या बजेटमधल्या 10 मोठ्या घोषणा वाचल्यात का?

तू नेता... योद्धा वीर राष्ट्रसंग्रामी, तू राजधुरंधर, माणूस अंतर्यामी, तू लेखक, वक्ता, रसिक स्वयंप्रज्ञेचा, तू जणू प्राण, यशवंत महाराष्ट्राचा... अशी कविता अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केली.

Maharashtra Budget 2022: तू प्रारंभ यशवंत महाराष्ट्राचा, अजित पवारांच्या बजेटमधल्या 10 मोठ्या घोषणा वाचल्यात का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 4:31 PM

मुंबई: तू नेता… योद्धा वीर राष्ट्रसंग्रामी, तू राजधुरंधर, माणूस अंतर्यामी, तू लेखक, वक्ता, रसिक स्वयंप्रज्ञेचा, तू जणू प्राण, यशवंत महाराष्ट्राचा… अशी कविता अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज बजेट सादर करताना विधानसभेत सादर केली. या कवितेतून त्यांनी अर्थसंकल्पाच्या (Maharashtra Budget)  माध्यमातून चव्हाण साहेबांना अपेक्षित असलेला, त्यांच्या स्वप्नातला प्रगत, पुरोगामी, समर्थ, बलशाली महाराष्ट्र घडवण्यास निश्चित होईल असा विश्वास  व्यक्त केला. अजित पवार (health) यांनी राज्याचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून अर्थ संकल्पातून आरोग्यावर अधिक भर देण्यात आला आहे. तसेच राज्यातील विविध महामंडळांसाठी भरीव तरतूदही करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अंदाजात महसूली जमा 4,03,427 कोटी रुपये, महसूली खर्च 4,27,780 कोटी रुपये आणि महसूली तूट 24,353 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे.

10 मोठ्या घोषणा

  1. विकासाची पंचसूत्री-कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित. येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी तरतुद.आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये तरतुद. मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतुद.पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी 28 हजार 605 कोटी तरतुद.उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद.
  2. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान -10 हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनेसाठी ३ वर्षात १ हजार कोटी रुपये निधी देण्यात येईल. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करुन ते 75 हजार रूपये वाढ. बाजार समित्यांनी (306) पायाभूत सुविधांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची 100% परतफेड करण्यासाठी सहाय. किमान आधारभूत किंमतीनुसार शेतमाल खरेदी कर‍िता 6 हजार 952 कोटी रूपयांची तरतूद
  3. भूविकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी, बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रूपये एवढी देणी अदा करणार.
  4. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमधे केळी, ड्रॅगन फ्रुट, एव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश. देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा
  5. 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या तीन वर्षात लिथोट्रिप्सी उपचार पद्धती सुरु करणार. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आधुनिक “फेको” उपचार पद्धती सुरु करणार. 50 खाटांच्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्रे व 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता यंत्रे देणार. मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा देणार. हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.
  6. रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माणासाठी 500 कोटी रुपये खर्चून “इनोव्हेशन हब” स्थापन करण्यात येणार. स्टार्ट अप फंडासाठी 100 कोटी.
  7. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया,नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार. 16039 कोटी रुपयांच्या नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरु. मुंबईतील मेट्रो मार्गिका क्रमांक 3, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्ग‍िकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज व पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट मेट्रो प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु.
  8. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 3000 नवीन बसगाड्या व 103 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य. शिर्डी ,रत्नागिरी , अमरावती व कोल्हापूर विमानतळाची कामे गडचिरोलीला नवीन विमानतळ
  9. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थाना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी 250 कोटी रूपये, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 500 कोटी रुपयांवरुन वाढवून 700 कोटी रुपये
  10. सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 13,340 कोटी रुपयांची तरतूद, वार्षिक योजना 1,50,000 कोटी, अनुसुचित जाती 12,230 कोटी रुपये , आदिवासी विकास 11,199 कोटी रुपये

संबंधित बातम्या:

Maharashtra Budget : कोरोनानं महाराष्ट्राचा कणा ढिला केला, आरोग्य योजनांसाठी 10 मोठ्या घोषणा कोणत्या?

Maharashtra Budget Session 2022: ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजा केंद्रस्थानी, शेती समृद्धीसाठी अजित पवारांच्या मेगा प्लॅनमधल्या 10 मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प सादर

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.