शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक, मोदींच्या कालच्या वक्तव्यानंतर घडमोडींना वेग

आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज तातडीची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडत आहे. या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक, मोदींच्या कालच्या वक्तव्यानंतर घडमोडींना वेग
राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेगImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 4:35 PM

मुंबई : आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार (Sharad pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यात आज तातडीची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडत आहे. या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. कालच पंतप्रधान मोदी (Pm Modi)यांनी चार राज्यातील विजयानंतर ईडीच्या कारवाईंवरून इशारा दिला होता. काही लोक ईडीच्या कारवाईंना धार्मिक रंग देत आहेत. मात्र मी भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे पवारांचे नाव न घेता मोदींनी म्हटलं होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गोवा, उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात जोरदार फटका बसला होता. तर भाजपची पुन्हा एकदा सरशी झाली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

बैठकीत कोणत्या विषयावर खलबतं?

महाराष्ट्रात पालिका निवडणुका तूर्ताप पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरीही पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी राज्यातील निवडणुकांसाठी आधीच रणनिती ठरवावी लागणं अपरिहार्य ठरणार आहे. त्यासाठी राज्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांची बैठक बोलावली असल्याचा तर्क जाणकारांकडून लढवला जातो आहे. कालच पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेत. त्यात आम आदमी पार्टी सोडली तर इतर पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसचीही अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तर राष्ट्रवादीच्या हातीही भोपळा लागला आहे. तसेच गोव्यात शिवसेनेला काही जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तिथेही शिवसेनेच्या पदरी नोटापेक्षाही कमी मतं आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. त्यानंतर आता राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय.

काल मोदी काय म्हणाले?

भ्रष्टाराचाविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत. असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. कारण नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शरद पवारांनी यावर भाष्य केले होते. मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊशी जोडला जातोय असा आरोप पवारांनी केला होता. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर कोर्टाच्या निर्णयावरही सवाल उपस्थित केले आहेत. त्याचाही मोदींनी गुरूवारी समाचार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीती नेत्यांविरोधात ज्या कारवाई सुरू आहेत, त्या भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यावरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Budget 2022 : कळसूत्री सरकारने पंचसूत्रीच्या माध्यमातून विकास पंचतत्वात विलीन केला, बजेटनंतर फडणवीस आक्रमक

Maharashtra Budget 2022: राज्यात CNG होणार स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा काय?

Maharashtra Budget 2022: तू प्रारंभ यशवंत महाराष्ट्राचा, अजित पवारांच्या बजेटमधल्या 10 मोठ्या घोषणा वाचल्यात का?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.