AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : एनडीएची देणार कायम साथ की येणार काकांच्या गोटात? अजितदादांसमोर पर्याय तरी काय?

Ajit Pawar-Sharad Pawar : राज्यात अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीने मुसंडी मारली. एनडीएच्या 400 पार नाऱ्याची महाराष्ट्रात हवा निघाली. त्यानंतर सत्ता समीकरण आणि सारीपाटावरील राजकारण नवीन वळणावर येऊ पाहत आहे.

Ajit Pawar : एनडीएची देणार कायम साथ की येणार काकांच्या गोटात? अजितदादांसमोर पर्याय तरी काय?
अजित पवार
| Updated on: Jun 08, 2024 | 9:35 AM
Share

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत उभी फुट पडली. त्यानंतर आतापर्यंतच इतिहास उगळायची गरज नाही. महाविकास आघाडीने 400 पारचे स्वप्न भंग केल्याने राजकारणाच्या सारीपाटावर अनेक नेत्यांना नवीन वळण खुणावत आहे. अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाला एकच जागा मिळण्याचे रोखठोक उत्तर दिले. गुरुवारी मुंबईत त्यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. त्याला 41 आमदारांपैकी 5 जणांना दांडी मारली. कोणी परदेशी दौऱ्यावर तर इतरांनी वैयक्तिक कारण देत बैठकीकडे पाठ फिरवली. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत अजितदादांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. विधानसभा तोंडावर आली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला राजकारणात संख्याबळ दाखवावे लागणार आहे.

चार जागांपैकी एक जागा

राष्ट्रवादी अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीसाठी पाच जागा मिळाल्या होत्या. ऐनवेळी परभणीची जागा मित्र पक्ष रासपचे महादेव जानकर यांना द्यावी लागली. उर्वरीत चार जागांपैकी एकच जाग अजित पवार गटाला खिशात टाकता आली. सुनील तटकरे विजयी झाले. तर दुसरीकडे शरद पवार यांनी 10 पैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला. प्रतिष्ठेची करण्यात आलेली बारामतीची जागा सुप्रिया सुळे यांनी जिंकली. या सर्व घडामोडींमुळे अजित पवार गटातील अनेक आमदार अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाने पण अनेकांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. एक मोठा गट घरवापसी करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. अर्थात या जर-तरच्या गोष्टी आहेत.

विधानसभेची चिंता

लोकसभेतील ही खराब कामगिरी अजित पवार गटासाठी चिंतेचा विषय आहे. विधानसभेच्या तोंडावर एक जागा आणि 3.6 टक्के मतदान हा घोर लावणारा विषय आहे. विधानसभेचा रागरंग वेगळा असला तरी महाविकास आघाडीविषयीची सहानुभूतीची लाट ओसरणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. लोकसभेत शरद पवार गटाला 8 जागा आणि 7 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे विधानसभेपूर्वी काही जण वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अजित पवार गटात खदखद

अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला. त्यावेळ अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात येत होता. काही शहरात तर पोस्टर, बॅनर पण लागले होते. त्यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागते, याची आठवण करुन दिली होती. लोकसभेच्या प्रदर्शनानंतर अजित पवार यांना विधानसभेसाठी मोठे संख्याबळ लागणार हे निश्चित आहे. जागा वाटपात लोकसभेसारखी तडजोड करावी लागली तर अजित पवारांना मुख्यमंत्री कसं करणार असा प्रश्नही कार्यकर्त्यांना सतावत आहे. सध्या अजित पवार एनडीए सोबत आहे. अर्थात काळाच्या उदरात काय दडलंय हे आताच सांगता येणार नाही.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा