Ajit Pawar: राष्ट्रवादीचं विलिनिकरण होणार का? शरद पवार एनडीएत येतील? अजित पवार यांचा सर्वात मोठा दावा काय?

Ajit Pawar on NCP Unity: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही पक्षांची युती झाली आहे. त्यामुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजितदादांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते मोठे संकेत दिले आहेत. काय म्हणाले अजितदादा?

Ajit Pawar: राष्ट्रवादीचं विलिनिकरण होणार का? शरद पवार एनडीएत येतील? अजित पवार यांचा सर्वात मोठा दावा काय?
अजित पवार, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 08, 2026 | 1:12 PM

Ajit Pawar on NCP Merge: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा अटकळी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. महापालिका निवडणूक झाली की शरद पवार हे भाजपप्रणीत NDA सोबत येतील असा दावा करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी युती केली आहे. त्यामुळे या चर्चांना हवा मिळाली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजितदादांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत या विषयावर भाष्य केले आहे. टीव्ही9 मराठीच्या अँकर निखिला म्हात्रे यांनी त्यांची ही खास मुलाखत घेतली.या मुलाखतीतून दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणार आणि विलिनीकरणावर  अजितदादांनी मोठे भाष्य केलं आहे.

कार्यकर्त्यांमध्ये जुळेल सूर

सध्याच्या राजकीय आघाड्या आणि युती यांचा पट उलगडत अजितदादांनी मोठे विधान केले आहे. पुणे आणि पिंपरी महापालिकेचा दाखला त्यांनी यासाठी दिला आहे. लोकांना काय वाटतं माहीत नाही. ते त्या अँगलने का विचार करतात ते माहीत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती करतोय. कोल्हापुरात आधी युती झाली होती. जेव्हाही चर्चा केल्यावर कुणाला तरी बरोबर घेतलं पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सूर जुळले पाहिजे. त्यानंतर युतीची गोष्ट पुढे आली. पण शेवटच्या क्षणापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवडमध्ये तर दोन तीन प्रभागात शिंदे सेनेसोबत युती झाली आहे. पण त्याची चर्चा होणार नाही. पण याची चर्चा होईल. अर्थात जनतेला एकत्र येण्याचा अधिकार आहे, असे सूतोवाच अजितदादांनी केले.

तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही याविषयी त्यांनी मोठे संकेत दिले. त्यांनी राष्ट्रवादीचा धांडोळा घेत, इतके वर्ष राष्ट्रवादी म्हणून काम केलं ना. २०२१नंतर आम्ही वेगळे झालो होतो. पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही एकत्र काम केलं आहे. मी मघाशी कुणाला तरी सांगितलं की कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. त्यामुळे देश पुढे जात असतो, असे मोठे संकेत दिले. तर बजेट आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यावर दोन्ही राष्ट्रवादीबाबत बोलणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राजकारणाची दिशाही परिस्थिती आणि वेळेनुसार ठरते असे त्यांच्या विधानातून ध्वनीत होत आहे.

युती आणि आघाडीची मुभा 

यावेळी राज्यातील विविध महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीचा मागोवा घेताना अजितदादांनी मोठे विधान केले. कोणत्याही क्षेत्रात एखाद्या गोष्टीचा कसा अर्थ काढावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवसेना आणि मनसे हे पण अनेक वर्, काम करत आहेत. आता बरोबर एकत्र आले आहे. आम्हीही मधल्या काळात वेगळे झाले. नगर पालिकेत कोल्हापुरातही युती झाली होती. आताच नाही झाली. ९० नंतर कधी एका पक्षाचं सरकार आलं नाही. नेहमी कुणाला तरी आघाडी किंवा युती करावी लागली. लोकसभा आणि विधानसभेला आघाडी होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यकर्त्याला मुभा दिली जाते. एक तर नऊ वर्षाने निवडणूक आली आहे. नऊ वर्ष निवडणूक नाही झाली. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळाली पाहिजे. काही ठिकाणी भाजप शिवसेना युती झाली. काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती झाली तर काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी युती झाली. त्या त्या ठिकाणची भौगौलिक परिस्थिती परिस्थिती पाहून तिथल्या लोकांनी निर्णय घेतला. त्यांना मुभा दिली, असे अजितदादांनी स्पष्ट केले.