मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनचे नमते; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

आता अ‌ॅमेझॉनचे अधिकारी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करणार का, हे पाहावे लागेल.  | Amazon vs MNS

मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनचे नमते; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मुंबई आणि पुण्यात खळखट्याकचा सपाटा लावल्यानंतर अ‍ॅमेझॉनने (Amazon) नमते घेतले आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
अ‌ॅमेझॉनकडून मनसेला तसे कळवण्यात आले आहे. मात्र, आता अ‌ॅमेझॉनने राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफीही मागावी, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळे आता अ‌ॅमेझॉनचे अधिकारी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करणार का, हे पाहावे लागेल. (Amazon ready to include Marathi language on website)

तत्पूर्वी काल अ‌ॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेवरुन सुरु झालेल्या मोहिमेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांना 5 जानेवारीला दिंडोशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसैनिक प्रचंड संतापले होते. महाराष्ट्रातील अमेझॉनचे पहिले कार्यालय असणाऱ्या कोंढवा येथील अमेझॉनच्या ऑफिसवर शुक्रवारी सकाळी मनसैनिकांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर दुपारी मुंबईच्या चांदिवली परिसरातील अमेझॉनच्या गोदामाची स्थानिक कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.

काय आहे नेमका वाद?

अ‌ॅमेझॉनने मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना व्यवहार करणे सोपे होईल आणि ते संकेतस्थळावरुन आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‌ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‌ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्या मालाची डिलिव्हरी होऊन देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.

राज ठाकरेंना नोटीस

मराठी भाषेवरुन सुरु केलेल्या मोहिमेवरुन अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पाच जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. “अ‍ॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागेल, असा इशारा मनसेच्या अखिल चित्रे यांनी दिला होता.

संबंधित बातम्या:

मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली

Amazon vs MNS | राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

(Amazon ready to include Marathi language on website)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI