मोठी बातमी : सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेणार

जे. जे. समूह रुग्णालयातील सफाई कामगारांच्या पाल्यांना नियमानुसार वारसा हक्काने शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोठी बातमी : सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेणार
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख


मुंबई : जे. जे. समूह रुग्णालयातील सफाई कामगारांच्या पाल्यांना नियमानुसार वारसा हक्काने शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया प्रलंबित आहे. अशा कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी वारसा हक्काअंतर्गत शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. या प्रक्रियेला गती देऊन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यावरही अमित देशमुख यांनी भर दिलाय (Amit Deshmukh direct administration to complete process of recruitment of families of cleaning worker).

मंत्रालयात जे.जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याविषयी अमित देशमुख यांनी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. या बैठकीस वैद्यकिय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनचे गोविंदभाई परमार आदींसह सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अमित देशमुख म्हणाले, “2014, 2017 आणि 2021 नुसार ज्या सफाई कामगारांना अद्याप वारसा हक्कानुसार शासकीय सेवेत सामावून घेतले नाही. अशा कामगारांना नियमानुसार कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठीच्या प्रक्रियेस गती द्यावी. तसेच चतुर्थ श्रेणी पदासाठी भरण्यात येणाऱ्या जागा या बाह्यकृत सेवेद्वारे भरण्यात येतील. मात्र, जे कामगार पिढ्या दर पिढ्या सफाई कामगारांचे काम करीत आहेत, त्यांना या भरतीमध्ये प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.”

“चतुर्थ श्रेणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत आणि त्यांच्या अन्य समस्या सोडविण्यासंदर्भातही शासन सकारात्मक आहे,” अशी माहिती अमित देशमुख यांनी यावेळी दिली.

हेही वाचा :

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, मुंबईतील ‘या’ संस्थेत कोविड लस निर्मिती करणार, अमित देशमुखांची मोठी घोषणा

लातूर ग्रामीणच्या फिक्सिंगचा वाद पुन्हा उफाळला, भरबैठकीतच अमित देशमुख आणि निलंगेकरांची जुगलबंदी

जोतिबांनी जिथे पहिली मुलींची शाळा सुरु केली त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचं रुपांतर स्मारकात होणार

व्हिडीओ पाहा :

Amit Deshmukh direct administration to complete process of recruitment of families of cleaning worker

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI