रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार, अमित देशमुख यांची मोठी घोषणा

राज्यातील रंगकर्मींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. रंगकर्मींसाठी रंगकर्मी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. (amit deshmukh discuss with marathi cinema artists on various issues)

रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार, अमित देशमुख यांची मोठी घोषणा
amit deshmukh

मुंबई: राज्यातील रंगकर्मींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. रंगकर्मींसाठी रंगकर्मी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. (amit deshmukh discuss with marathi cinema artists on various issues)

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल राज्यातील विविध कला क्षेत्रातील रंगकर्मीशी मंत्रालयात संवाद साधला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रमार्फत अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री मेधा घाडगे, विजय राणे, संचित यादव, शीतल माने, अमिता कदम, सुभाष देशमुख, उमेश ठाकूर, चंद्रशेखर सांडवे , आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात वेगवेगळया कलाक्षेत्रात अनेक कलाकार काम करीत आहे. या सर्व रंगकर्मीसाठी हे कल्याणकारी मंडळ काम करणार असून हे मंडळ लवकर स्थापन होण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील आहे. राज्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हास्तरावर करण्यात येत असले तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ऑनलाईन कलाकार नोंदणी कशी सुरू करता येईल याबाबत प्रयत्न करावेत, असं देशमुख यांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेचा धोका, खबरदारी घ्या

कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून राज्य शासनामार्फत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी ही कलाकार आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी असून अजूनही कोविडचा धोका टळलेला नाही. वेगवेगळ्या क्षेत्रासाठी राज्यभरातील निर्बंध कमी करण्यात येत असले तरी संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे खबरदारी घेणे तितकेच आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

5 टक्क्यांची घरे

म्हाडा आणिस सिडकोच्या घरांमध्ये रंगकर्मीसाठी राखीव ठेवलेल्या सदनिकांमध्ये मुंबईमध्ये 5 टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 2 टक्के प्रमाण असावे अशी मागणी आपण यापूर्वीच राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

रंगकर्मींच्या मागण्या

रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र या संस्थेतर्फे काही कायमस्वरुपी मागण्या करीत असलेले पत्रक देशमुख यांना देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील रंगकर्मीची नोंद होणे, कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींमध्ये शिथिलता आणणे, असंघटित रंगकर्मीसाठी रंगकर्मी बोर्ड स्थापन करणे, वयोवृध्द रंगकर्मीसाठी शासकीय आणि खाजगी वृध्दाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी, एकपात्री किंवा दोनपात्री कलाकारांना कला सादर करण्याची परवानगी, अटी व नियमांचे पालन करुन रंगकर्मींना कला सादर करण्याची परवानगी अशा काही मागण्या यावेळी रंगकर्मीनी देशमुख यांना केल्या. (amit deshmukh discuss with marathi cinema artists on various issues)

संबंधित बातम्या:

दारुच्या त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात, भाजपने लॅबमध्ये पाठवाव्यात; राऊतांचा टोला

चांगली बातमी : लवकरच लहान मुलांची स्वदेशी लस येणार, ‘या’ महिन्यापर्यंत मुलांसाठी लस उपलब्ध?

लोकल पाससाठी मुंबईकरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी, प्रशासन सज्ज, पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?, वाचा

(amit deshmukh discuss with marathi cinema artists on various issues)

Published On - 10:45 am, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI