AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचंय; संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Sanjay Raut | खासदार संजय राऊत यांनी आज एकदम खळबळजनक दावा केला आहे. अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. पण सत्तेचा सारीपाट तुमच्या इशाऱ्यावर चालणार नाही, असे टोला त्यांनी हाणला. मशाल आणि तुतारी हे दोन चिन्हं लोकांपर्यंत पोहचवावी लागतील, असे ते म्हणाले.

Sanjay Raut | अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचंय; संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
| Updated on: Feb 28, 2024 | 12:00 PM
Share

मुंबई | 28 February 2024 : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं असल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान पदासाठी शर्यतीत अमित शाह आहेत. पण सध्या पतंप्रधान नरेंद्र मोदी आहेत, सत्तेचा सारीपाट तुमच्या इशारावर चालणार नाही, असा टोला ही त्यांनी शाह यांना लगावला. बाळासाहेब आणि त्यांच्या घराण्याचं बोट धरून राज्यात भाजप वाढल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी इतर अनेक मुद्दांवर बेधडक मत मांडले.

तर भाजप औषधाला ही दिसली नसती

त्यांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शहा हल्ली परिवार वादावर बोलतात घराणेशाही वर बोलतात, या देशातील काही घरांना प्रतिष्ठा आहे त्यातील एक ठाकरे घराण्याला, या देशात शरद पवारांच्या घराण्याला देखील प्रतिष्ठा आहे कारण या दोन्ही घराण्यांनी देशाला, महाराष्ट्राला, समाजाला खुप काही दिलंय आणि या घराण्यांचे लाभार्थी नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचाराव, बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे, बाळासाहेब ठाकरे जर नसते तर भारतीय जनता पार्टी राज्यात औषधालाही दिसला नसता, बाळासाहेबांचा आणि त्यांच्या घराण्याचं बोट धरून राज्यात भाजप पक्ष वाढलेला आहे, असे ते म्हणाले.

घराणेशाहीवर पलटवार

घराणे शाहीची गोष्ट करता जय शहा आपल्या घराण्याचे नाहीत का, जय शहा आपले चिरंजीव आहेत ते गृहमंत्र्यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी काय क्रिकेटमध्ये 100 सेंच्युर्या मारल्या आहेत का, त्यांनी काय 5000 बळी घेतले आहेत का, विराट कोहली, सेहवाग पेक्षा जास्त सिक्सर मारले आहेत का, की त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे कोणाच्या घराणेशाहीवर आपण बोलतायत, ठाकरे आणि पवारांची घराणेशाही देशाला आणि समाजाला कायम निर्णयदायी दिशा देणारी असल्याचे ते म्हणाले.

अमित शाह यांना पतंप्रधान पदाची स्वप्न

इथे कोणाला मुख्यमंत्री बनायचं नाही, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे पण मी अजून सांगतो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत सत्तेचा सारीपाट तुमच्या इशारावर चालणार नाही. तुमच्याकडे सत्ता पैसा आणि तपास यंत्रणा आहेत म्हणून तुमचं चालला आहे ज्या दिवशी ज्या दिवशी तुमच्याकडे हे नसेल तेव्हा तुमची अवस्था देशात काय असेल याचा विचार करा, असा टोला राऊत यांनी लगावला.

मोदी यांना भीती

त्यांना महाविकास आघाडीची भीती आहे त्यामुळे त्यांना वारंवार यावं लागत आहे, त्यांना ठाकरे पवारांची भीती आहे, ते पोहरादेवीला येत आहेत, पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही.  पोहरादेवी ही प्रामाणिक माणसांच्या पाठीशी उभी राहते, अख्या महाराष्ट्रातून गाड्या भरभरून येत आहेत, सर्वांना कामाला लावल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भ दौऱ्यावर केला.

मशाल तुतारी चिन्ह प्रचार

तुतारी आणि मशाल लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, प्रचार करावा लागेल महत्त्वाच्या बैठका, दौरे करावे लागणार मात्र डिजिटल युगामध्ये चिन्ह पोहोचायला फार वेळ लागत नाही, ज्यांना धनुष्यबाण आणि घड्याळ मिळालं ते घड्याळ चालू आहे का हे तपासून त्यांना पहावं लागेल आणि धनुष्यबाणाचा प्रत्यंत जो असतो तो जागेवर आहे का येताना पहावं लागेल, मशाल आणि तुतारी लोकांच्या मनात पोहोचलेली आहे, असा दावा त्यांनी केला.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.