‘नागरिकांना रुग्णालयात बेड नाहीत, दुसरीकडे जा म्हणून सांगितलं जातंय’, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'नागरिकांना रुग्णालयात बेड नाहीत, दुसरीकडे जा म्हणून सांगितलं जातंय', अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी काका असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णांच्या अडचणींची माहिती देणारं पत्र लिहिलं आहे (Amit Thackeray write letter to Uddhav Thackeray).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

May 03, 2020 | 8:19 PM

मुंबई : राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी काका असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णांच्या अडचणींची माहिती देणारं पत्र लिहिलं आहे (Amit Thackeray write letter to Uddhav Thackeray). आमच्याकडे बेड नाहीत, दुसऱ्या रुग्णालयात जा म्हणून नागरिकांना काढून दिलं जात आहे. त्यावर उपाय योजना कराव्यात. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रत्येक रुग्णालयाची ऑनलाईन माहिती उपलब्ध व्हावी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे. या पत्रात राज्य सरकार अनेक चांगले प्रयत्न करत असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

अमित ठाकरे यांनी या पत्रात म्हटले, “महाराष्ट्र शासन कोविड 19 चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करत आहे. मात्र या आजाराचा प्रादुर्भाव सर्व सामान्य व्यक्तींना झाला, तर त्यांनी काय करावं यावर काम करण्याची गरज आहे. तुम्ही यासाठी हेल्पलाईन सुरु केली आहे याची मला पूर्णपणे माहिती आहे. तरिही अनेक नागरिकांना हा आजार झाल्यानंतर काय करावे, कोठे जावे हे कळत नाही. यासंदर्भात आमच्याकडे असंख्य तक्रारी आल्या आहेत. उपचारादरम्यान अनेक नागरिकांना आमच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. अशावेळी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मनस्थिती बिकट असते. या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सर्व रुग्णालयाची माहिती अॅपवर उपलब्ध करावी.”

सध्याच्या युगात बहुतांश लोकांकडे अँड्रॉईड मोबाईल उपलब्ध आहे. त्यामुळे कोविड 19 आणि इतर रुग्णालयांची माहिती असणारं अॅप उपलब्ध झालं तर नागरिकांना माहिती मिळणं सोयीस्कर होईल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना होणारा नाहक त्रास होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने अशाप्रकारे कोविड आणि इतर रुग्णालयांची तेथे उपलब्ध असणाऱ्या बेडच्या संख्येसह माहिती देणाऱ्या अॅपची निर्मिती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमित ठाकरे यांनी केली आहे.

Amit Thackeray write letter to Uddhav Thackeray

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें