AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Paper Leak: वा रे गुरुजी, एमपीएससी पेपरफुटीचा आरोपी तर ‘आदर्श’ शिक्षक! हेट स्टोरीतून असा उघड झाला मामला

MPSC Inspector Paper Leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर लीक प्रकरणात एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहे. यातील आरोपी अमृत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे समोर आले. या उत्कृष्ट शिक्षकानेच पेपर फोडल्याचे समोर आले आहे.

MPSC Paper Leak: वा रे गुरुजी, एमपीएससी पेपरफुटीचा आरोपी तर 'आदर्श' शिक्षक! हेट स्टोरीतून असा उघड झाला मामला
एमपीएससी पेपरफुटीचा आरोपी 'आदर्श' शिक्षकImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 9:20 AM
Share

MPSC पेपर लीक प्रकरणात संशयित आरोपी ऋतुजा पाटील यांचे वडील अमृत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अमृत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीने अमृत पाटील यांना २०२३-२४ या वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपर लीक प्रकरणात अमृत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणात संशयित मुख्य आरोपी म्हणून ऋतुजा पाटील यांचे नाव समोर आले असून, ऋतुजा पाटील सध्या फरार असल्याची माहिती आहे. त्यांच्या वडीलांना पोलिसांनी अटक केली आहे.

12 लाखांत पेपर फोडला

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमृत पाटील यांनी एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांशी संगनमत केले. त्यासाठी या तीन अधिकाऱ्यांना 12 लाख रुपये देण्यात येणार होते. त्यातील 5 लाख रुपये त्यांनी अगोदर अधिकाऱ्यांना दिले. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली. त्यातील 40 हजार प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेमामुळे पाणी फेरले गेले.

लव्ह स्टोरी ते हेट स्टोरी

या पेपरफुटीमागील एक लव्ह अँगलही समोर आला आहे. अमृत पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील हिचे गौरव उर्फ लोकेश पाटील याच्याशी प्रेमसंबंध समोर आले आहे. अमृत पाटील यांनी कौटिल अकादमीच्या प्रवीण पाटील या दलालामार्फत 22 मार्चच्या परीक्षेपूर्वी मुलीसाठी प्रश्नपत्रिका मिळवली. प्रेमापोटी तिने हा पेपर प्रियकर गौरव याला पाठवला. निकाल जाहीर झाला. त्यात ऋतुजा ही गुणतालिकेत राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ऋतुजा पाटील आता आपल्यापासून दूर जाईल. ती अधिकारी होईल या भीतीने गौरवने थेट एमपीएससीकडे थेट पेपरफुटीची तक्रार दाखल केली.

दबाव येताच वेड्याचे सोंग

तक्रार दाखल झाल्याची वार्ता एमपीएससीतील अधिकाऱ्यांना वेळीच मिळाली. त्यांनी गौरव याच्यावर दबाव वाढवला. मग दुसऱ्या दिवशी गौरवने परीक्षेची पुन्हा संधी मिळावी यासाठी आपण मुद्दाम असा बनाव रचल्याचा कांगावा केला. पण चौकशीची चक्रे फिरली होती. पोलिसांनी याप्रकरणात तक्रारदार गौरव पाटील याच्यासह अव्वर सचिव, इतर दोन अधिकारी, शिक्षकासह 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर ऋतुजा पाटील अद्याप फरार आहे. तिला पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. पेपरफुटीला आळा घालण्यात पुन्हा एकदा अपयश आल्याचे या प्रकरणात समोर आले आहे. NEET, TET आणि आता औषध निरीक्षकाचाही पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...