आनंदराव अडसूळांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीकडून चौकशी होणार?

| Updated on: Oct 01, 2021 | 1:34 PM

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा देण्यात आला नाही. त्यामुळे अडसूळ यांची ईडी मार्फत चौकशी अटळ असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Anandrao Adsul moves HC against money laundering probe, no relief from court)

आनंदराव अडसूळांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीकडून चौकशी होणार?
Anandrao Adsul
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा देण्यात आला नाही. त्यामुळे अडसूळ यांची ईडी मार्फत चौकशी अटळ असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अडसूळ हे गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आनंदराव अडसूळ यांच्या वकिलाने आज उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीकडून अडसूळ यांची सुरू असलेली चौकशी आणि ECIR रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. ईडीच्या वकिलांनी त्याला कडाडून विरोध केला. आम्ही ECIR दाखल केला आहे. त्यात मनी लॉन्ड्रिंग झाली आहे. त्यामुळे अडसूळ यांची चौकशी होणे गरजेचं असल्याने अडसूळ यांच्या वकिलांनी केलेली मागणी मान्य होऊ नये, अशी विनंती ईडीच्या वकिलांनी कोर्टाला केली. हायकोर्टाने दोन्ही बाजूंची मते ऐकून घेतल्यानंतर अडसूळ यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

8 ऑक्टोबर रोजी सुनावणी

ईडीचे अधिकारी जेव्हा समन्स घेऊन आले तेव्हा अडसूळ यांच्यावर लाईफलाईन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आता त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असंही अडसूळ यांच्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. तर, आम्हाला बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची आहे. त्या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांचा कबुलीजबाब नोंदवाल आहे. काही बँक खातेदारांचा जबाबही नोंदवला आहे, असं ईडीच्या वकिलाने कोर्टात स्पष्ट केलं. त्यावर आम्हाला याचिकाकर्त्याच्या राजकीय किंवा निवडणूक पिटिशनशी काही घेणंदेणं नाही, असं सांगत कोर्टाने या प्रकरणावर 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.

ईडीची धाड कशासाठी?

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतलं.

आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

अडसूळांवर कोणते आरोप?

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.

 

संबंधित बातम्या:

आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात, तब्येत बिघडल्याने अॅम्ब्युलन्स बोलावली!

शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात?, आनंदराव अडसूळ ED कार्यालयात हजर

आनंदराव अडसूळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, सोमय्यांची ED-RBI कडे चौकशीची मागणी

(Anandrao Adsul moves HC against money laundering probe, no relief from court)