तब्बल साडे हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा कल्याणमधील अवलिया

अनंत जोशी यांनी हजारो लोकांशी भेटून 35 वर्ष मेहनत घेत त्यांनी हा संग्रह जतन केला आहे. तर 2005 च्या महापुरात यातील सुमारे 200 टोप्या, पगडी, शिरस्त्राण पाण्यात भिजून खराब झाल्याने फेकून द्यावे लागल्याची दुःखद आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

तब्बल साडे हजार युद्धकालीन शिरस्त्राण, टोप्या, पगड्यांचा संग्रह करणारा कल्याणमधील अवलिया
कल्याणच्या अनंत जोशी यांनी जमविलेल्या ऐतिहासिक टोप्या पगड्या आणि शिरस्त्रणेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 6:47 PM

कल्याणः कल्याणमध्ये राहणारे अनंत जोशी (Anant Joshi) यांनी रामायाण आणि महाभारत पाहून 35 वर्षात ऐतिहासिक काळातील शिरस्त्रण, टोप्या, पगड्या गोळ्या गेल्या आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक वस्तूंच्या ( historical objects) या अनोखा छंदाचा हा विषय चर्चेचा ठरला आहे. त्यांच्या घरातच त्यांनी साडे तीन हजार प्रकारच्या या टोप्या, पगड्या, शिरस्त्रणे जमविली आहेत. त्यांच्या या छंदामुळे (Hobbies) त्यांचे घर म्हणजे संग्रहालय झाले आहे. या संग्रहालयाची त्यांची एक दुःखद आठवणही ते सांगतात की, 2005 मध्ये आलेल्या महापुरामुळे पाणी घरात शिरल्याने अनेक टोप्या, जिरेटोप भिजल्यामुळे बाहेर टाकून द्यावे लागले होते.

कल्याणमध्ये राहणारे अनंत जोशी हे मूळचे व्यावसायिक असून त्यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून त्यांनी गेल्या 35 वर्षांपासून हा आपला अनोखा छंद जोपासला आहे. कल्याण स्टेशन परिसरातील त्यांच्या जुन्या घरात हा ठेवा जोपासून ठेवण्यात आला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी ते खूप आजारी पडले होते. त्या आजारपणात त्यांनी महाभारत आणि रामायण या मालिका त्यांनी बघितल्या.

टीव्ही मालिकांमुळे आकर्षण

या मालिकेत असणाऱ्या कलाकारांनी घातलेले टोप त्यांना त्या काळात आकर्षित करत होते. या टोप बद्दल माहिती मिळवताना त्यांची जिज्ञासा वाढत गेली. त्यातून त्याना इतिहासकालीन विविध देशातील टोप्या जमा करण्याचा छंद लागला.

विविध देशात भटकंती

या संग्रहालयाचे त्यांनी शिरोभूषण असं नामकरण देखील केलं आहे. भारतात सत्ता गाजवलेल्या मराठा, राजपूत, मुघल काळातील युद्धकालीन शिरस्त्राण, जिरेटोप आदींचां खजिना आहे. जगभरातील ब्रिटन, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया आदी देशांतील विविध टोप्या, पगड्या, युद्धकालीन जिरेटोप, शिरस्त्राण जोशी यांच्या संग्रही आहेत. यातील सर्वात जुने म्हणजे 18 व्या शतकात अफाणिस्तानमध्ये धातूंपासून बनवलेले शिरस्त्राणही आपल्या संग्रही असल्याचे जोशी यांनी सांगितले. वयाच्या 17 व्या वर्षांपासून भारतासह 5 ते 7 देश भटकंती करत, इतर देशांतून माहिती मिळवून त्या ठिकाणाहून टोपी आणत होते.

लिम्का बूकमध्ये नोंद

या त्यांच्या आवडी त्यांनी हजारो लोकांशी भेटून 35 वर्ष मेहनत घेत त्यांनी हा संग्रह जतन केला आहे. तर 2005 च्या महापुरात यातील सुमारे 200 टोप्या, पगडी, शिरस्त्राण पाण्यात भिजून खराब झाल्याने फेकून द्यावे लागल्याची दुःखद आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. जोशी यांच्या या अनोख्या छंदाची दखल लिम्का बुकने घेतली असून लिम्का बुकमध्ये गेल्या 20 वर्षांपासून तर इंडिया बुकमध्ये गेल्या 10 वर्षांपासून या आपल्या छंदाचा समावेश केला आहे. तर संपूर्ण जगभरात मानाचे स्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या गिनीज बुकनेही आपल्या कामाची दखल घेतली असल्याचे अनंत जोशी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

Sharad Pawar Narendra Modi Meet: पवार-मोदी भेटीवर दिल्लीपासून गल्लीपर्यंत तर्कवितर्क, फक्त एकाच नेत्याचं भाकीत खरं ठरलं; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Big Breaking : मुंबईत 99.13 टक्के रुग्णांमध्ये ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगचा चकीत करणारा अहवाल

UGC आता घेऊन येत आहे नवीन नियम, प्राध्यापक बनण्यासाठी आता PhD, NET ची गरज नाही

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.