पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये ‘नो एन्ट्री’

Andheri Subway Waterlogging | यंदा जून महिन्यात पहिल्याच दहा दिवसांत मुंबईत महिन्याभराइतका पाऊस पडला आहे. या काळात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळाले होते.

पावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये 'नो एन्ट्री'
अंधेरी सबवे
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 2:36 PM

मुंबई: शहरातील सखल भागांपैकी एक असलेल्या अंधेरी सब वे मध्ये पावसाळ्यात (Rain) पाणी साचत असल्यामुळे वाहतूक विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारपासून तब्बल महिनाभर अंधेरी सब वे रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. (Waterlogging at Andheri Subway in Mumbai)

त्यामुळे 21 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमधून प्रवास करता येणार नाही. रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत हा मार्ग बंद राहील. मुंबईत जरासा जास्त पाऊस पडला की अंधेरी सब वेमध्ये लगेच पाणी साठते. अशावेळी रात्री पाऊस सुरु असल्यास साचलेल्या पाण्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी महिनाभर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा जून महिन्यात पहिल्याच दहा दिवसांत मुंबईत महिन्याभराइतका पाऊस पडला आहे. या काळात मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळाले होते.

दरम्यान, हवामान विभागाने सोमवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर रायगड जिल्ह्यातील रोहा आणि अलिबाग परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत रडार बसवणार

हवामानाचे अंदाज आणखी अचूकरित्या वर्तवण्यासाठी राज्यातील चार ठिकाणी रडार यंत्रणा लावण्यात येणार आहे. यापैकी एक रडार मुंबईच्या बोरिवली परिसरात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाचा (Rain) अंदाज अधिक अचूकरित्या वर्तवला जाईल. मुंबई आणि कोकण परिसरात चार रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. आयआयटीएम या संस्थेतर्फे ही रडार बसवली जातील. तर हवामान खात्याकडून रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकातील मंगळुरू या परिसरात नव्या रडार यंत्रणा लावण्यात येतील. या रडार यंत्रणा 100 किलोमीटरच्या परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तवतील.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत ‘या’ भागात रडार बसवणार

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.