आझाद मैदानावर उद्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धरणे आंदोलन; किसान मोर्चाचा जाहीर पाठिंबा

मुंबईः अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या (Anaganwadi Emloyee) मानधनात वाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, मराठी ऍप, अंगणवाड्यांच्या भाडेपट्टीत वाढ, आहाराच्या दरात वाढ या मागण्यांसाठी (Demands) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमधील अंगणवाडी कर्मचारी उद्यापासून तीन दिवस मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) तीव्र धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात मुंबई व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रोज 200 […]

आझाद मैदानावर उद्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धरणे आंदोलन; किसान मोर्चाचा जाहीर पाठिंबा
महादेव कांबळे

|

Feb 22, 2022 | 6:56 PM

मुंबईः अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या (Anaganwadi Emloyee) मानधनात वाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, मराठी ऍप, अंगणवाड्यांच्या भाडेपट्टीत वाढ, आहाराच्या दरात वाढ या मागण्यांसाठी (Demands) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमधील अंगणवाडी कर्मचारी उद्यापासून तीन दिवस मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) तीव्र धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात मुंबई व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रोज 200 च्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनात कृती समितीचे सर्व प्रमुख नेतेही सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्याती आली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी याआधीही विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर उद्यापासून अंगणवाडी कर्मचारी तीव्र आंदोलन करणार असून या आंदोलनात आता पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन होत असले तरी आता या कर्मचाऱ्यांनी जिल्हा पातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचारी आता 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात जिल्हा पातळीवर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

सकारात्मक चर्चा झाली नाही तर…

आझाद मैदानावरील धरणे आंदोलनाच्या वेळी शिष्टमंडळाला निमंत्रित करून सकारात्मक चर्चा झाली नाही तर अंगणवाडी कर्मचारी प्रकल्प, जिल्हा परिषद, विभागीय उपायुक्त कार्यालये या ठिकाणीही तीव्र आंदोलन करणार आहेत. ज्यामध्ये राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.विधानसभेचे बजेट सत्र सुरू होणार असल्याने आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातून हजारो अंगणवाडी कर्मचारी सामील होणार असून 9 मार्च रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे.

संयुक्त संपाची घोषणा

28 व 29 मार्च या दोन दिवशी देशव्यापी सार्वत्रिक संयुक्त संप पुकारण्यात आला आहे. देशातील कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात हा संप पुकारला आहे. संयुक्त किसान मंचाने त्याला जाहीर पाठिंबाही दर्शविला आहे.

मोदी सरकारच्या काळात प्रचंड महागाई

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढली आहे. सर्व सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्यात आले आहे. देशातील मोठ्या व्यावसायिकांनी अनेक बँकांचे कोट्यवधींती रक्कम बुडवली आहे, आणि पळून गेले आहेत, देशात अशी लूट चालू असताना मात्र शेतकरी आणि कामगारांविरोधात कायदे केले जात आहेत. कामगार आणि शेतकऱ्यांविरोधात कायदे केले जात आहेत. याविरोधातच हा संप पुकारला आहे. सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक दिवस जिल्हा, तालुका पातळीवरील संयुक्त आंदोलनासाठी एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील यांच्य कृती समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

पुण्यानंतर मुंबई मेट्रोच्या उद्घटनावरूनही कलगीतुरा? भाजप नेत्यांची मागणी काय?

सुप्रिया सुळेंसह महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसद रत्न पुरस्कार, अभिनंदन आत्या..! पार्थ पवार यांचं खास ट्विट

माझ्या माणसांना भडकवण्याचे धंदे बंद कर, नाही तर घरातून उचलून नेईन; काँग्रेस नेते संजय दत्त यांची कर्मचाऱ्याला दमबाजी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें