VIDEO: अनिल देशमुख-सचिन वाझे भेटले, 10 मिनिटे बोलले; वसुली प्रकरणाला टर्न मिळणार?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील भेटीचा मुद्दा तापलेला आहे. त्यातच आज वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट झाल्याची माहिती उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

VIDEO: अनिल देशमुख-सचिन वाझे भेटले, 10 मिनिटे बोलले; वसुली प्रकरणाला टर्न मिळणार?
anil deshmukh

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील भेटीचा मुद्दा तापलेला आहे. त्यातच आज वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट झाल्याची माहिती उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाझे-देशमुखांमध्ये तब्बल दहा मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे वसुली प्रकरणाला टर्न मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माजी न्यायामूर्ती चांदीवाल यांच्यासमोर आज सुनावणी होती. या सुनावणीसाठी सचिन वाझे आणि अनिल देशमुख आले होते. यावेळी वाझेंनी देशमुखांशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देशमुखांनी वाझेंना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनावणी तहकूब झाल्यानंतर चांदीवाल यांच्या दालनातून बाहेर पडत असताना या दोघांमध्ये चर्चा झाली. तब्बल दहा मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर झाली हे समजू शकले नाही. एका दालनात या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. वाझे आणि देशमुख बऱ्याच कालावधी नंतर एकमेकांना भेटल्याने या भेटीबाबतचे विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पोलिसांच्या पहाऱ्यानंतरही भेट

काल परमीबर सिंग आणि वाझे यांच्यात अर्धा ते पाऊणतास भेट झाली होती. या भेटीची माहिती उघड होताच एकच खळबळ उडाली. राज्य सरकारनेही या प्रकरणाची दखल घेऊन त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सिंग, वाझे, देशमुख यांच्या सुनावणी दरम्यान पोलिसांचा पहाराही वाढवला आहे. असं असतानाही आज वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

वाझेंची उलट तपासणी करा

दरम्यान, या सुनावणीवेळी वाझेंची उलटतपासणी करण्याची माझ्या वकिलांना परवानगी द्यावी, अशी विनंती देशमुख यांनी आयोगाला केली आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमीः राज्यात संरक्षण आणि आरोग्य विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटले

कोरोना काळात गुजरात, उत्तर प्रदेशसारखी स्थिती महाराष्ट्रात झाली नाही; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला

VIDEO: अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले, पोलिसांना सूचना गेल्या ‘हे होऊ द्या’; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Published On - 3:43 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI