AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला खूप मदत केली, ते लवकरच…; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Anil Thatte on Sanjay Raut Loksabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या निकालाआधी एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. अनिल थत्ते काय म्हणाले? वाचा सविस्तर......

संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला खूप मदत केली, ते लवकरच...; 'त्या' वक्तव्याने खळबळ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 01, 2024 | 4:53 PM
Share

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला संजय राऊत यांची खूप मदत होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला संजय राऊत लीड करत होते. वैशाली दरेकर यांना उमेदवारी ही संजयने प्लॅन केलेली गोष्ट आहे. यासाठी एकनाथ शिंदे त्यांना मदत करतील कदाचित संजय राऊत जेलमध्ये जाणार नाही. समोरून नाहीतर संजय राऊत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेला मदत करतो. तर जितेंद्र आव्हाड हे देखील एकनाथ शिंदेला मदत करतात, असं खळबळजनक विधान राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी केलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना अनिल थत्ते यांनी हे विधान केलं आहे.

आव्हाडांबाबत काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे आहेत. मात्र तिथेही जितेंद्र आव्हाड यांनी अॅक्टिव्हिटी केली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेला मदत करण्याचे कारण अजित पवार गटात गेलेल्या नजीब मुल्ला विधानसभेत उभा राहिला. तर एकनाथ शिंदे यांची आव्हाड यांना मदत होईल, असंही अनिल थत्ते म्हणालेत.

राऊतांबाबत मोठा दावा

देवेंद्र फडणीस आणि संजय राऊत यांनी मला सांगितलं होतं. एकनाथ शिंदे यांना बंड करून टाकायला सांगा. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर संजय राऊत यांनी मला सांगितलं. बरं झालं आमचं सरकार गेलं. कारण आमच्या सरकार विरुद्ध लोकांच्या मनात चीड निर्माण झाली होती. त्यामुळे सर्व अडचणी आलो असतो, असंही अनिल थत्ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळी बंड केला आणि त्या वेळेला दोघांनी सांगितलं की तू तुझी भूमिका घे .मी माझी भूमिका घेतो. यामुळे आमचा भरभरून पराभव झाला असता. मात्र या सर्व गोष्टींमुळे सहानुभूती मिळाली. हे संजय राऊत यांनी स्वतः मला सांगितलंय. ठाकरे सगळ्यांकडून पैसे घ्यायचे व त्यांचे निर्णय मातोश्रीवर त्यांच्या पत्नी घ्यायच्या. हे स्वतः एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं. सर्वेच कागदपत्र व ठेकेदारांना डायरेक्ट मातोश्री वरती बोलायला जात होते आणि डायरेक्ट डील करायचे. हा अपमान झाल्यामुळे शिंदे त्यांनी बंड केला, असंही अनिल थत्ते टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.

Follow Us
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम