AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania: आता त्यांना कोणीच वाचवू शकणार नाही, मुंढवा प्रकरणात अंजली दमानियांचा संताप, काय दिला इशारा

Anjali Damania on Parth Pawar: मुंढवा जमीन गैरव्यवहार आणि नियम धाब्यावर बसवून झालेल्या खरेदीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणातही मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाल्या दमानिया?

Anjali Damania: आता त्यांना कोणीच वाचवू शकणार नाही, मुंढवा प्रकरणात अंजली दमानियांचा संताप, काय दिला इशारा
अंजली दमानिया Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 26, 2026 | 12:33 PM
Share

Anjali Damania on Parth Pawar: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार आणि नियमांना बगल देऊन केलेली खरेदी वादात सापडली आहे. यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे अडचणीत आले आहेत. आता याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी खरगे समितीच्या अहवालाचा दाखला देत पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी भोंदू अशोक खरात याच्या परदेश वारीविषयी सुद्धा मोठा खुलासा केला आहे.

अमेडिया कंपनी दोषी

खरगे समितीचे अहवालात प्रथमतः अमेडिया कंपनी ही जी जमीन विकत घेणारी कंपनी होती ती दोषी आहे असं सरळ सरळ अहवालात नमूद केले आहे. तर समितीने फौजदारी बाबींसाठी योग्य विभागाकडे शिफारस केली आहे. सर्वप्रथम चौकशी समिती हे स्पष्टपणे नमूद करू इच्छिते की सदरील प्रकरणांमध्ये शासकीय जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरण करण्याची आणि ही बाब अतिशय गंभीर आहे या गंभीर आणि विक्री करणारे खरेदी करणारे म्हणजे अमेडिया कंपनी म्हणजेच पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील दोषी आहेत.

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा

अमेडिया कंपनी दोषी आहे, असं अहवालात म्हटले आहे. समितीच्या अहवालात म्हटले आहे की अमेडिया कंपनी ही या व्यवहारात दोषी आहे, फौजदारी कारवाई करण्यासाठी प्रकरण गृह विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे याप्रकरणात आता कारवाईची अपेक्षा फडणवीस यांच्याकडून आहे. विकणारी आणि विकत घेणारी व्यक्ती दोन्ही दोषी आहेत असं समितीचे म्हणणं आहे. सरळ सरळ पार्थ पवार यांचं नाव घेण्यात आले आहे. आता कोणी त्यांना वाचवू शकणार नाही. फौजदारी कारवाई झालीच पाहिजे. गुन्हा नोंद झाला पाहिजे. दिग्विजय यांची १ टक्क्याची भागीदारी आहे. बाकी ९९ टक्के भागेदारी पार्थ पवार यांची आहे. त्यामुळे आता कारवाई झाली पाहिजे. कोणीही वाचवू शकणार नाहीत असे अंजली दमानिया म्हणाल्या. आता जर मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, अथवा त्यांना पाठीशी घातले गेले तर हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

स्क्रॅप डिलरने घडवली परदेश वारी

खरात प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत. त्यांची ओळख दाखवू नका. त्यांचे फोटो वायरल करू नका त्यांची ओळख पटेल असं काहीही करू नका , अशी मागणी दमानिया यांनी केली. स्क्रॅप डिलरने खरातला परदेशाची ट्रिप दिली. काही दिवस ते परदेशात होते, असा गौप्यस्फोट दमानिया यांनी केला. एका व्यक्तीकडे खरातचे सगळे पुरावे होते मात्र त्याने घाबरुण काहीच केले नाही. ज्यांनी हे प्रकरण बाहेर काढले अशा लोकांना कृपया करून त्यांना त्रास देऊ नका, असे आवाहनही दमानिया यांनी केले.

किळस येते आता मला , काय चाललंय?

मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी दमानिया यांनी संताप व्यक्त केला. शासकीय निवासस्थानी झिरवळ पाहायला मिळते आहेत. पवन यादवचे अनेक फोटो अनेक राजकीय नेत्यांसोबत आहे . किळस येते आता मला , काय चाललंय? कॅरेक्टरवर प्रश्न निर्माण करणारा वीडियो झिरवळ यांचा बाहेर आला आहे. हे नेते आपल्या देशाला पुढे नेणार? तत्काळ त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर त्यांना काढले पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?