Breaking : मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोन, मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा फोन आल्यानंतर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या निनावी फोन कॉलबाबत सध्या तपास सुरु करण्यात आलाय.

Breaking : मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोन, मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
वांद्रे रेल्वे स्टेशन
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 9:52 PM

मुंबई : मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा फोन आल्यानंतर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या निनावी फोन कॉलबाबत सध्या तपास सुरु करण्यात आलाय. या तपासानंतरच हा फेक कॉल होता का? याबाबत स्पष्टता येईल. मात्र, पोलिसांकडून मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (Anonymous phone call to Bandra Railway Police, threat of bomb blast in Mumbai)

मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

यापूर्वी 7 ऑगस्ट रोजीही एका निनावी फोन कॉलद्वारे सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बींच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून तातडीने शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता त्यावेळी शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता त्याला परत फोन लावल्यावर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर त्याने आपला फोन बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. शेवटी पोलीस तपासात हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं.

एका बेवड्यानं मुंबई पोलिसांनी चांगलंच फिरवलं!

तर मार्चमध्ये एका बेवड्यानं मुंबई पोलिसांना फिरवल्याची घटना घडली होती. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. या फोनवरील व्यक्तीने मुलुंड परिसरात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने मुलुंडमध्ये सर्च ऑपरेशन सुरु केले. मात्र, तपासाअंती याठिकाणी पोलिसांना कोणताही बॉम्ब मिळाला नाही. अधिक चौकशी केल्यानंतर एका दारूड्याने मद्याच्या नशेत पोलिसांना फोन केल्याची माहिती समोर आली.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन!

नवरात्रोत्सवाच्या पहिल्यात दिवशी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर रिकामा करण्यात आला. मात्र, बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण मंदिर परिसरात पाहणी केल्यानंतर अशी कुठलीही स्फोटक वस्तू किंवा पदार्थ मिळून आला नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर भाविकांसाठी अंबाबाई मंदिर खुलं करण्यात आलं होतं.

इतर बातम्या :

Amravati Violence : अमरावती हिंसाचारानं हादरली, पालकमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, बैठकीत शांततेसाठी मंथन होणार

Milind Teltumbde | पोलिसांच्या धुमश्चक्रीत मिलिंद तेलतुंबडे ठार?; गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठे कोम्बिंग ऑपरेशन

Anonymous phone call to Bandra Railway Police, threat of bomb blast in Mumbai

मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.