मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण, शेलारांची खरपूस टीका

शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता गुजराती मतदारांनाही साद घालण्याचे ठरवले आहे (Ashish Shelar Uddhav Thackeray Aapda)

मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण, शेलारांची खरपूस टीका
अनिश बेंद्रे

|

Jan 06, 2021 | 7:49 AM

मुंबई : दिवसेंदिवस शिवसेनेचा पायाखालचा मतदारवर्ग घसरत चालल्याने कृत्रिम वलय तयार केलं जात आहे. शिवसेनेने आत्मविश्वास गमावला, म्हणून त्यांना खमंग ढोकळा आठवला, अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. (Ashish Shelar criticises Uddhav Thackeray Aapda Tagline)

भाजपकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानामुळे आता शिवसेना मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटीन मतदारांना साद घालायचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून आता शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजराती मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जिलबी अने फाफडा, जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका गुजराती मुंबईकरांनी आता घेतली आहे, अशी खरमरीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

भाजपचे 12 नेते राज्याचा दौरा करणार

दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीची बैठक हा नियोजित कार्यक्रम आहे. ही आमच्या पक्षाची कामाची पद्धत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार करत भाजपचे 12 नेते राज्याचा दौरा करतील, अशी माहिती आशिष शेलार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

“आमची रणनीती ही विजयनीती”

महाविकास आघाडीतील एकही पक्ष आमच्याशी एकटं लढू शकत नाही, हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आमची रणनीती ही विजयनीती असेल. पक्षाचे 12 प्रमुख नेते ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी फिरणार आणि महाविकास आघाडीला जागा दाखवून देणार, असा इशारा शेलारांनी दिला.

रोज सरकार पडणार म्हणून ओरडायचे आणि फोडाफोडी करायची, हे दुबळ्यांचे राजकारण आहे. नवी मुंबईमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

माणूस अनुभवाने शिकतो, शिवसेनेच्या जिलेबी फापडा, उद्धव ठाकरे आपडावर काँग्रेसची प्रतिक्रिया

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

(Ashish Shelar criticises Uddhav Thackeray Aapda Tagline)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें