1600 कोटी गेले कुठे, 400 कोटी हवेत कशाला, आशिष शेलारांचा शिवसेनेला सवाल

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महापालिकेच्या ( BMC) कारभारावरुन शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला.

1600 कोटी गेले कुठे, 400 कोटी हवेत कशाला, आशिष शेलारांचा शिवसेनेला सवाल
आशिष शेलार, भाजप
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 1:49 PM

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महापालिकेच्या ( BMC) कारभारावरुन शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. मुंबई महापालिका कोरोनावर 6 महिन्यात 1600 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगतेय. पालिकेने अजून 400 कोटी हवेत असे म्हणतेय पण झालेल्या खर्चाचा हिशोब का देत नाही?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही निशाणा साधला. मुंबई महापालिकेच्या 1600 कोटीच्या मंजुरीनंतर 400 कोटींचा प्रस्ताव आल्यानं भाजपनं हिशोब देण्याची मागणी केली, असं आशिष शेलार म्हणाले. (Ashish Shelar demand record of BMC corona expenditure of money spend on corona)

मुंबई महापालिकेने 1600 कोटींचा हिशोब पारदर्शकपणे द्यावा, अशी मागणी आशिष शेलारांनी केली. मुंबईचा एक एक माणसाचा जीव वाचला पाहिजे ही सत्य परिस्थिती आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या वेळी झालेल्या खर्चाचा हिशोब मुंबई पालिका का देत नाही, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाला वरळीच्या कोविड सेंटरमध्ये काम आणि जावयाला सॅनिटायझर पुरवण्याचं काम देण्यात आले, त्यांना किती मिळाले? सँनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले?, अशा प्रश्नांची सरबत्ती आशिष शेलार यांनी केली आहे.  महापालिका वरळीला विशेष निधी देते, त्यामुळं वरळीला वेगळा न्याय का आणि इतर भागाला वेगळा न्याय का?  महापौरांच्या मुलाला आणि जावयाला वेगळा न्याय आणि मुंबईकरांना वेगळा न्याय का?,असही आशिष शेलार म्हणाले.

लपवा छपवी का करताय?

आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर कोरोना काळातील खर्चावरुन टीकास्त्र सोडलं आहे. 1600 कोटी रुपयांचा हिशोब देण्याऐवजी महापालिकेकडून लपवा छपवी का करण्यात येतेय, असंही ते म्हणाले. मुंबई महापालिका 1600 कोटींच्या हिशोबाची लपवाछपवी का करतेय, असंही ते म्हणाले. पालिकेने कोणतीही लपवाछपवी न करता 1600 कोटी रुपयांचा हिशोब द्यावा अशी मागणी, आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजपची सूचना का नाकारली

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजपनं 400 कोटी रुपयांच्या मागणीच्या प्रस्तावाला परत पाठवा अशी सूचना केली होती. सत्ताधारी शिवसेनेती सूचना नामंजूर का केली, असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.

मुंबईकर कोरोनानं दगावले सत्ताधाऱ्यांनी गोदाम भरले

कोरोना विषाणू संसर्गामुळं मुंबईकर नागरिकांना जीव गमवावा लागला. मात्र, या संकटकाळात पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार करुन त्यांचे गोदाम भरले, अशी टीका आशिष शेलारांनी शिवसेनेचे नाव न घेता केली आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

संबंधित बातम्या:

मुंबईकरांना मोठा दिलासा, थर्टी फर्स्टच्या रात्री ऑनलाईन फूड डिलिव्हरीची वेळ वाढवली

शिवसेनेचे ‘वाह ताज’; हॉटेलचे साडेआठ कोटींचे थकीत शुल्क माफ केल्याचा आरोप

(Ashish Shelar demand record of BMC corona expenditure of money spend on corona)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.