AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचे ‘वाह ताज’; हॉटेलचे साडेआठ कोटींचे थकीत शुल्क माफ केल्याचा आरोप

स्थायी समिती अध्यक्षांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावत हा प्रस्ताव पास केला. (Shivsena Exemption Mumbai Taj Hotel From Waived Money)

शिवसेनेचे 'वाह ताज'; हॉटेलचे साडेआठ कोटींचे थकीत शुल्क माफ केल्याचा आरोप
| Updated on: Dec 30, 2020 | 7:47 PM
Share

मुंबई : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील ताज हॉटेलवर मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना भलतीच मेहेरबान झाली आहे. 26 नोव्हेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव गेली 12 वर्षे हॉटेल भोवतीचा फूटपाथ आणि रस्त्याचा काही भाग ताज हॉटेल वापरत आहे. मात्र हा रस्ता आणि फूटपाथ वापराबद्दलचे सुमारे साडेआठ कोटी रुपयांचे शुल्क थकले होते. मात्र हे थकीत शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. (Shivsena Exemption Mumbai Taj Hotel From Waived Money)

तसंच यापुढील काळात फूटपाथ वापराचे 100 टक्के आणि रस्तावापराचे 50 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. रस्त्याची 869 चौरस मीटरची जागा आणि फूटपथाची 1136.3 चौरस मीटरची जागा ताज हॉटेलनं बॅरिकेट्स टाकून अडवली आहे.

स्थायी समितीत या प्रस्तावाला भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीनं विरोध करत यावर बोलण्याची मागणी केली. पण स्थायी समिती अध्यक्षांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावत हा प्रस्ताव पास केला.

एकीकडे सामान्य जनतेला एक पैशाचीही शुल्कमाफी मिळत नाही. तर दुसरीकडे मात्र फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या ताजला मात्र कोट्यवधींची शुल्कमाफी मिळते. या कारणावरून विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन पालिकेनं केल्यानं लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचे काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.

तर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीनं सुरक्षेच्या कारणास्तव काही उपाय केले आहेत. त्या कारणास्तव रस्ता आणि फूटपाथ वापरला जात असल्यानं शुल्क माफ केल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेनं केलं आहे. (Shivsena Exemption Mumbai Taj Hotel From Waived Money)

संबंधित बातम्या : 

सायरस पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या; मनसेची मागणी

मुंबईकर गाईडलाईन पाळतात, ज्यांना राजकारण करायचं, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील : किशोरी पेडणेकर

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.