समीर वानखेडेंना चारित्र्याचं सर्टिफिकेट देणं भाजपचं काम नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

दिवाळीनंतर बॉम्ब फुटणार आहेच हे स्पष्ट करतो, असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले. समीर वानखेडे यांना चारित्र्यांचं प्रमाणपत्र देणं हे भाजपचं काम नाही, असं स्पषटीकरण आशिष शेलार यांनी दिलं आहे.

समीर वानखेडेंना चारित्र्याचं सर्टिफिकेट देणं भाजपचं काम नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य
आशिष शेलार
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 10:50 AM

मुंबई: महाविकास आघाडीच्या एका मंत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मंत्र्याचे फुसके बार महाराष्ट्र आणि देशात पाहत आहोत. दिवाळीनंतर जो बॉम्ब देवेंद्र फडणवीस फोडणार आहेत तो फुटण्याआधीचं किंवा न फुटलेल्या बॉम्बचा आवाज ऐकून त्यांनी कानावर हात कसे ठेवले हे नवाब मलिक यांच्या बदलेल्या आवाजावरुन आणि चेहऱ्यावरुन स्पष्ट झालं. दिवाळीनंतर बॉम्ब फुटणार आहेच हे स्पष्ट करतो, असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले. समीर वानखेडे यांना चारित्र्यांचं प्रमाणपत्र देणं हे भाजपचं काम नाही, असं स्पषटीकरण आशिष शेलार यांनी दिलं आहे.

नवाब मलिकांनी माहिती का लपवली?

एनसीबीनं ड्रग्जच्या विरोधात बिनतोड कारवाई केली पाहिजे. यात कुणाचाही मुलाहिजा ठेवण्याची गरज नाही ही भाजपची भूमिका आहे. विरोधकांनी विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला तरी ड्रग्ज, गांजा, चरस आणि हर्बल तंबाखू जे दोन ग्रॅम असलं तरी कारवाई करावी, ही आमची भूमिका आहे. गेल्या दहा पंधरा दिवसानंतर म्हणजेच आर्यन खानला अटक झाल्यानंतर नवाब मलिक जी माहिती देत आहेत. ती माहिती आर्यन खानला अटक झाल्यानंतरची माहिती सर्वसाधारण आहे. नवाब मलिक यांनी काढलेले कपड्याचे मुद्दे असतील, त्यांचे ड्रेसेस असतील. प्रायव्हेट आर्मी असेल ही माहिती नवाब मलिक यांना असेल तर ती माहिती गुप्त का ठेवली.

नवाब मलिकांची नार्को टेस्ट करा

नवाब मलिक हे सर्वसाधारण माहिती देत आहेत. तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय?याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे, असं आशिष शेलार म्हणाले. या सर्व लपवालपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या दोघांची नार्कोटेस्ट करावी, असंही आशिष शेलार म्हणाले.

जे मंत्री सरकारची ढाल पूढे करून पोलीस यंत्रणा समोर जात नाही आहेत. कोर्टात जात नाही त्यामुळे नवाब मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी. ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांना आणि ज्यांनी आरोप केले त्यांना समान न्याय राज्य सरकारने न्याय द्यायला हवा नाहीतर अस होईल की सरकारचा या कटकारस्थानात सहभाग आहे, असा समज होईल असं आशिष शेलार म्हणाले.

इतर बातम्या:

राष्ट्रवादीला लागोपाठ दुसरा झटका, अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त होणार; आयकर विभागाची नोटीस

फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा

Ashish Shelar said character certificate issue to Sameer Wankhede is not our duty slam also on Nawab Malik

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.