Dhananjay Munde case | धनंजय मुंडेंना अभय म्हणजे राजकारणाचा परमोच्च बिंदू, भातखळकरांचा हल्लाबोल

Dhananjay Munde case | पवारांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. धनंजय मुंडे यांना अभय देणे चुकीचं असल्याचं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. (Atul bhatkhalkar Sharad Pawar)

Dhananjay Munde case | धनंजय मुंडेंना अभय म्हणजे राजकारणाचा परमोच्च बिंदू, भातखळकरांचा हल्लाबोल


मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंडेंची पाठराखण करत जोपर्यंत चौकशीतून काही समोर येत नाही, तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. मात्र, पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. धनंजय मुंडे यांना अभय देणे चुकीचं असल्याचं भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalka) यांनी म्हटलंय. “बलात्कारासारखे गंभीर आरोप असताना धनंजय मुंडे यांना अभय देणे म्हणजे राजकारणातील परमोच्च बिंदू आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेला जनता विसरणार नाही. जनता राष्ट्रवादीला धडा शिकवेल,” असं भातखळकर यांनी म्हटलंय. ते ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Atul bhatkhalkar criticised rashtrawadi and Sharad Pawar on Dhananjay Mundes allegation)

अशी लाजीरवाणी परिस्थीती महाराष्ट्राने कधी पाहिली नव्हती

यावेळी बोलताना अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप झाल्यानंतर 72 तास होऊन गेलेले असूनसुद्धा तक्रार दाखल करुन घेतली जात नाही. उलट एफआरआय न नोंदवण्याचं समर्थन राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांकडून केलं जातं. महाराष्ट्रात अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती,” असं भातखळकर म्हणाले.

जनता हे कधीही विसरणार नाही

यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना अभय मिळालं. महाराष्ट्रातील जनता हे कधीच विसरणार नाही. जनता राष्ट्रवादीच्या या भूमिकेविरोधात रस्त्यावर उतरुन त्यांना धडा शिकवेल असे, अशी टीका भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर केली.

शरद पवार काय म्हणाले ?

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या  नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आज (15 जानेवारी) धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

“राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

(Atul bhatkhalkar criticised rashtrawadi and Sharad Pawar on Dhananjay Mundes allegation)

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे प्रकरणात भाजप नेत्यांमध्येच दोन तट पडलेत का?

Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?

धनंजय मुंडे प्रकरणात गेल्या 51 तासात काय घडले?, वाचा 14 मोठ्या घडामोडी…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI