AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही तुमचा कट्टर शिवसैनिक, मनसे नेते नांदगावकरांची बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी (Bala Nandgaonkar on Balasaheb Thackeray) स्वतःला कट्टर शिवसैनिक असल्याचं म्हणत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.

आजही तुमचा कट्टर शिवसैनिक, मनसे नेते नांदगावकरांची बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली
| Updated on: Nov 17, 2019 | 1:00 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी (Bala Nandgaonkar on Balasaheb Thackeray) स्वतःला कट्टर शिवसैनिक असल्याचं म्हणत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. इन्स्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “आम्हाला आजही तुमचा कट्टर शिवसैनिक म्हणवून घ्यायला सार्थ अभिमान वाटतो. तुम्ही प्रेमाने, मायेने पाठीवरून फिरवलेला हात आणि वडीलकीच्या नात्याने ऐकवलेले शब्द, तसेच योग्यवेळी दिलेली शाब्बासकीची थाप हे सर्व आठवत आहे.”

बाळा नांदगावकर यांनी (Bala Nandgaonkar on Balasaheb Thackeray) आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आपल्या भावना मांडताना त्यांच्या निधनाचा दिवस भारतीय राजकारणातील काळा दिवस असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “आज 17 नोव्हेंबर आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या आयुष्यातील आणि भारतीय राजकारणातील काळा दिवस. बरोबर 7 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आमच्या दैवताला देवाज्ञा झाली आणि कट्टर शिवसैनिकांबरोबर अखंड महाराष्ट्र पोरका झाला. आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब गेले. बाळासाहेब 7 वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला पोरकं करून निघून गेलात. परंतु तुम्ही दिलेल्या शिकवणी, आदर्श, संस्कार आजही माझ्यासह सर्व शिवसैनिकांनी स्वतःमध्ये जपून ठेवल्या आहेत.”

View this post on Instagram

आज १७ नोव्हेंबर आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या आयुष्यातला व भारतीय राजकारणातला काळा दिवस. बरोब्बर सात वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आमच्या दैवताला देवाज्ञा झाली व कट्टर शिवसैनिकांबरोबर अखंड महाराष्ट्र पोरका झाला. आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब गेले…… साहेब सात वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला पोरकं करून निघून गेलात परंतु तुम्ही दिलेल्या शिकवणी, आदर्श, संस्कार आजही माझ्यासहित सर्व शिवसैनिकांनी स्वतःमध्ये जपुन ठेवल्या आहेत. आयुष्यामध्ये कितीही आव्हानं आली तरी धीराने त्याचा सामना कसा करायचा, कितीही अडचणी आल्या तरी आपली मुल्ये जपून ध्येयं साध्य कसं करायचं हे तुम्ही शिकवलंत. *जेव्हा बाहेर वादळ असत तेव्हा शांत बसायच व जेव्हा बाहेर वादळ नसतं तेव्हा वादळ निर्माण करायच ही शिकवण तुम्ही आम्हाला दिलेली आहे व संयम कधी सोडायचा याची पण शिकवण तुम्ही दिलीत*. आम्हाला आजही सार्थ अभिमान वाटतो तुमचा कट्टर शिवसैनिक म्हणवुन घ्यायला. तुम्ही प्रेमाने, मायेने पाठीवरून फिरवलेला हात व वडीलकीच्या नात्याने ऐकवले शब्द तसेच योग्यवेळी दिलेली शाब्बासकीची थाप हे सर्व आठवलं वाटतं कि आत्ता यावं तुमच्याकडे व तुमच्यासमोर नतमस्तक व्हावं. हे सर्व लिहीत असताना तो तुमच्यासोबतचा सहवासातील काळ डोळ्यासमोरून जातोय आणि तुमच्या आठवणीनी क्षणभर डोळ्यात पाणी उभं राहतंय….. आजही हा तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांसोबत व तुमच्या सावलीसोबत कायम आहे व कायम राहील….. मात्र दोघे भाऊ………. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.?????? – आपला नम्र बाळा नांदगावकर

A post shared by Bala Nandgaonkar (@bala_nandgaonkar) on

आयुष्यामध्ये कितीही आव्हानं आली, तरी धीराने त्याचा सामना कसा करायचा, कितीही अडचणी आल्या तरी आपली मुल्ये जपून ध्येय कसं साध्य करायचं हे बाळासाहेबांनी शिकवल्याचंही नांदगावकर यांनी नमूद केलं.

जेव्हा बाहेर वादळ असतं, तेव्हा शांत बसायचं आणि जेव्हा बाहेर वादळ नसतं, तेव्हा वादळ निर्माण करायचं ही शिकवण तुम्ही आम्हाला दिली आहे. संयम कधी सोडायचा याची पण शिकवण तुम्ही दिलीत.

“तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या सावलीसोबत”

बाळा नांदगावकर म्हणाले, “वाटतं कि आत्ता यावं तुमच्याकडे आणि तुमच्यासमोर नतमस्तक व्हावं. हे सर्व लिहीत असताना तुमच्यासोबतचा सहवासातील तो काळ डोळ्यांसमोरून जातोय. तुमच्या आठवणींनी क्षणभर डोळ्यात पाणी उभं राहतंय. आजही हा तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांसोबत आणि तुमच्या सावलीसोबत कायम आहे आणि कायम राहील.”

मात्र, दोघे भाऊ …

नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये दोघा भावांचा उल्लेख केला मात्र, त्यापुढे त्यांनी काहीच न लिहिता ते वाक्य अर्धवट सोडलं. यातून त्यांना बाळासाहेबांना काही तरी सांगायचं आहे, मात्र, ते मध्येच थांबले असं दिसत आहे. ते म्हणाले, “आजही हा तुमचा शिवसैनिक तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांसोबत आणि तुमच्या सावलीसोबत कायम आहे आणि कायम राहील. मात्र दोघे भाऊ … हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.”

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.