बालगंधर्व ही पुण्याची शान; बालगंधर्व जर पाडल तर अनेक कलाकारांच्या पोटावर गदा; सुरेखा पुणेकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

बालगंधर्व ही पुण्याची शान; बालगंधर्व जर पाडल तर अनेक कलाकारांच्या पोटावर गदा; सुरेखा पुणेकरांनी दिला आंदोलनाचा इशारा
राज ठाकरे यांची मानसिकता बिघडलेः सुरेखा पुणेकर

बालगंधर्व पाडण्याचा विचार काढून टाकावा असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे. बालगंधर्व पाडण्याचा विचार कोण करत असेल तर त्यासाठी सर्व कलाकारांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचेही लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सरकारला इशारा दिला आहे.

महादेव कांबळे

|

May 12, 2022 | 9:59 PM

पुणेः बालगंधर्व (Balgandharv) ही पुण्याची शान असून ती पाडू नये आणि कोणाला मल्टीप्लेक्स (Multiplex) बांधायचेच असेल तर अनेक जागा उपलब्ध आहेत अशी खरमरीत टीका लावणीसम्रज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी केली आहे. बालगंधर्व रंगमंदिराविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, बालंगधर्व ही जुनी आठवण असून बालगंधर्व जर पाडल तर अनेक कलाकारांच्या पोटावर गदा येणार आहे. त्यामुळे बालगंधर्व जर पाडण्याचा कुणाचा विचार असेल तर आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशीही टीका त्यांनी केली.

बालगंधर्व पाडण्याचा विचार काढून टाकावा असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे. बालगंधर्व पाडण्याचा विचार कोण करत असेल तर त्यासाठी सर्व कलाकारांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचेही लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सरकारला इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांची मानसिकता बिघडली

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, त्यांच्याविषयी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांची मानसिकता बिघडली असल्याचे सांगत त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. राज ठाकरे यांच्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, राज ठाकरे हे आंदोलनाची भाषा बोलतात, मात्र हा देश संविधानावर चालतो असंही त्यांनी मत व्यक्त केले.

आधी संविधान वाचावं

यावेळी राज ठाकरे यांच्या वक्तृत्वावर बोलताना त्यांनी राज ठाकरे यांनी संविधान वाचले नाही, म्हणून ते कोणाचीही अवहेलना करत असतात, त्यामुळे त्यांनी आधी संविधान वाचावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

कोणाचाही अवहेलना करतात

राज ठाकरे यांनी संविधान वाचले नाही नसल्यामुळेच ते कोणाच्याही विरोधात आंदोलनाची भाषा बोलतात, आणि कोणाचाही अवहेलना करतात अशी टीका सुरेखा पुणेकर यांनी केली आहे. त्यामुळे आंदोलन करण्याअगोदर संविधान वाचावं आणि मग पाऊल उचलावं असा सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांनी दिला आहे.

संविधान वाचून निर्णय घ्यावा

यावेळी त्यांनी संविधानाविषयी बोलत सांगितले की, त्यांनी जर संविधा वाचून आंदोलन केले तर काही अडचण येणार नाही, त्यामुळे संविधान वाचून राज ठाकरे यांनी निर्णय घ्यावा असंही त्यांनी म्हटले आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें