हा तर ‘शासकीय इतमामातील’ बंद; आशिष शेलारांची खवचट टीका

महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर भाजप नेते आशिष शेलार यांनी अत्यंत खवचट शब्दात टीका केली आहे. (Bandh implemented under the aegis of the government, Criticised BJP leader Ashish Shelar)

हा तर 'शासकीय इतमामातील' बंद; आशिष शेलारांची खवचट टीका
Ashish Shelar
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 2:02 PM

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर भाजप नेते आशिष शेलार यांनी अत्यंत खवचट शब्दात टीका केली आहे. महाराष्ट्रातील बंदला शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि जनतेचा विरोध होता पण शासकीय यंत्रणांचा गैरवापर करुन आघाडी सरकारने हा बंद जनतेवर लादला आहे. हा शासकीय ‘इतमामातील’ बंद असून तिघाडी सरकारला जनता ही अशाच प्रकारे शासकीय ‘इतमामात’ निरोप देईल, अशी खवचट टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन आजच्या बंदवरून आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आघाडी सरकारला बंद आणि स्थगिती हे दोन शब्द फार प्रिय आहेत. गेल्या पावणे दोन वर्षे याचा अनुभव महाराष्ट्रातील जनता घेते आहे. आता कुठे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांचे जनजीवन सुरळीत होते तेव्हा असे बंद लादण्यात आले .जनतेचा या बंदला विरोध होता पण शासकीय अधिकारी कालपासून जनतेच्या मनात भिती निर्माण करीत होते. पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं सांगत होते. तर बेस्टचे महाव्यवस्थापक पण अशाच प्रकारे बंद यशस्वी कसे होतील या कामाला लागले होते. पोलीस संरक्षणात, भीती निर्माण करुन हा बंद लादण्यात आला त्यामुळे हा बंद शासकीय इतमामातील बंद आहे, असं शेलार म्हणाले.

पवारांचे आवाहन शेतकऱ्यांनी धुडकावले

ज्या सोलापूरमधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंदचे आवाहन केले तिथे पहाटे पासून मार्केट यार्ड सुरु होते. शेतकऱ्यांनी आपला माल यार्डात आणला आणि विकला. बंदला प्रतिसाद दिला नाही. ज्या दादरमध्ये शिवसेना भवन आहे त्या दादरची मंडईत शेतीमाल आला, 10 वाजेपर्यंत सर्व व्यवहार झाले. शेतकऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला नाही. औरंगाबादसह राज्यातील बऱ्याच मंडयांमध्ये शेतीमाल आला व लिलावही झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने या तिघाडीच्या ढोंगी बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत. तर साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज खासदार छत्रपती उदयनराजे स्वतः रस्त्यावर उतरले. बाईक चालवून बंद छत्रपतींच्या वशंजानी बंद धुडकारला. शिर्डीत सर्व व्यवहार सुरु आहेत. जनतेने, शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे, असं सांगतानाच ठाकरे सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एवढीच काळजी आहे तर तुम्ही मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, असे आव्हानच त्यांनी ठाकरे सरकारला दिले.

सरकारकडून वसुली करा

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बंदमधील नुकसानीची आघाडीकडून वसुली करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई हायकोर्टाने बंद करण्यास मनाई केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो घेऊन अवमानना केल्याप्रकरणी या पूर्वी बंद पुकारला म्हणून शिवसेनेला दंड ठोठावला होता. सेनेने त्याची भरपाई भरली होती. त्यामुळे आजच्या बंदमध्ये जे काही नुकसान होईल, त्याची भरपाई ही सरकारकडून वसूल केली पाहिजे. कोर्टाने स्यूमोटोद्वारे या घटनेची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवादच; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती हल्ला

ज्यांनी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलं त्याना काय शिक्षा झाली पाहिजे?; फडणवीसांचं रोखठोक उत्तर

‘नैतिकता शिल्लक असेल तर महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा’ फडणवीसांचं आव्हान

(Bandh implemented under the aegis of the government, Criticised BJP leader Ashish Shelar)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.