AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामती विमान अपघातानंतर माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर, मुलीच्या निधनानंतर आईची मृत्यूशी झुंज

बारामती विमान अपघातात मुलगी गमावलेल्या माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दादरच्या रुग्णालयात आईची मृत्यूशी झुंज सुरू असून, उपचारांच्या खर्चासाठी वडिलांनी मदतीची आर्त हाक दिली आहे.

बारामती विमान अपघातानंतर माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर, मुलीच्या निधनानंतर आईची मृत्यूशी झुंज
pinky mali
| Updated on: Mar 01, 2026 | 11:37 AM
Share

महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ भीषण विमान अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात आपली तरुण मुलगी गमावल्यानंतर आता मुंबईतील माळी कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. पिंकी माळी यांच्या मातोश्रींची रुग्णालयात झुंज सुरु आहे. यामुळे सध्या माळी कुटुंबिय हे सध्या मोठ्या संकटात सापडले आहे.

पिंकी माळी यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु

बारामती विमान अपघातात पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा पिंकी माळी यांच्या आई माया माळी यांना जबरदस्त धक्का बसला. मुलीच्या जाण्याने त्या कोलमडून गेल्या. गेल्या महिन्याभरापासून माय माळी या सतत रडत आहे. त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना उपचारासाठी दादर येथील शुश्रूषा सिटीझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल लिमिटेड (Shushrusha Citizens’ Co-operative Hospital Limited) मध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुलीला गमावल्यानंतर आता पत्नीला वाचवण्यासाठी धडपड

पिंकी माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारच बेताची आहे. पिंकीचे वडील टॅक्सीचालक म्हणून काम करतात. गेल्या ६ दिवसांपासून माया माळी यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारांचा खर्च लाखांच्या घरात असल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आपल्या मुलीला गमावल्यानंतर आता पत्नीला वाचवण्यासाठी तिचे वडील धावपळ करत आहेत.

माळी कुटुंबावर मोठा आघात

पिंकी माळीच्या वडिलांना पैसे कुठून उभे करायचे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्यांनी आता मित्रपरिवाराकडे आणि विविध समाजसंस्थांकडे मदतीसाठी हात पसरले आहेत. रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी आणि पत्नीवर योग्य उपचार होण्यासाठी त्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. आपल्या लाडक्या मुलीला गमावल्यानंतर हंबरडा फोडत वडिलांनी, “मुलगी गेली, आता पत्नीला वाचवा” अशी आर्त हाक दिली आहे. यामुळे सध्या संपूर्ण माळी कुटुंबावर मोठा आघात झाल्याचे बोललं जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...