AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेस्टच्या 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 70 टक्के कर्मचारी विलगीकरणात

बेस्टमधील 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने तब्बल 600 कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात (BEST Employee Corona Positive) आले आहे.

बेस्टच्या 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 70 टक्के कर्मचारी विलगीकरणात
| Updated on: May 12, 2020 | 11:00 AM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 23 हजार 401 वर पोहोचला (BEST Employee Corona Positive) आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईसह इतर ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्टमधील 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तब्बल 600 कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

बेस्टच्या 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने 600 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात 70 टक्के चालक आणि वाहकांचा समावेश आहे. तर उर्वरित कर्मचारी हे तांत्रिक आणि विद्युत विभागातील आहेत. या सर्वांना घरातच विलग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल्वे, रिक्षा-टॅक्सी बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीचा भार सध्या बेस्टवर आहे. बेस्टच्या दररोज दीड हजार बसगाडया रस्त्यावर धावतात. त्यात तीन हजारपेक्षा जास्त चालक-वाहक कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक निरिक्षक आणि परिवहन विभागाबरोबरच विद्युत विभागातील कर्मचारीही कार्यरत आहेत.

पण मास्क, सॅनिटायझरचा वापर, बेस्ट आगारात तपासणी होऊनही बेस्टमधील कर्मचाऱ्यांना करोनाचा विळखा बसत आहे. ज्या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे किंवा जे कर्मचारी अन्य व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत. त्यांना घरातच विलग राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे आता जवळपास 600 हून जास्त कर्मचारी घरातच विलगीकरणात राहत आहे, असे बेस्ट उपक्रमाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल कुमार सिंगल यांनी सांगितले.

गेल्या 15 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी कामावर परतले आहेत. पण यादरम्यान इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा नव्याने काहींचे विलगीकरण करावे लागलं आहे. त्यात सध्या 55 पेक्षा जास्त वय असलेले कर्मचारी, अपंग कर्मचाऱ्यांसह उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या दीड हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना घरात राहण्याच्या सूचना आहेत. या सर्व बाधितांच्या संपर्कातील शेकडो कर्मचाऱ्यांना अलगीकरणात राहावे लागत (BEST Employee Corona Positive) आहे.

संबंधित बातम्या : 

नियम बदलताच, डिस्चार्जची संख्याही वाढली, सौम्य लक्षण आढळल्यास टेस्ट न करताच डिस्चार्ज

लॉकडाऊन वाढवण्याचे पंतप्रधानांचे संकेत, सर्व मुख्यमंत्र्यांना रणनीती आखण्याच्या सूचना

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.