निवडणुका प्रतिकांवर होतात; मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत: राज ठाकरे

कोरोना आजार आहे, पण मानसिक आजार आहे. आताच्या परिस्थितीत निवडणुकीचा विचार नको. (bjp in rule because of modi, says raj thackeray)

निवडणुका प्रतिकांवर होतात; मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत: राज ठाकरे
राज ठाकरे, मनसेप्रमुख

मुंबई: भारतातील निवडणुका प्रतिकांवर होत असतात. जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बघून शिवसेनेला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघून भाजपला सत्ता दिली, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. (bjp in rule because of modi, says raj thackeray)

राज ठाकरे यांनी दैनिक ‘लोकसत्ते’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील निवडणूक आणि नागरिकांच्या मानसिकेतेवर भाष्य केलं. मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं. तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसंच झालं. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

निवडणुकीचा विचारच नको

कोरोना आजार आहे, पण मानसिक आजार आहे. आताच्या परिस्थितीत निवडणुकीचा विचार नको. लोकांची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही. समाज राहिला तर निवडणुका घेण्यात अर्थ आहे. समाजाचं मन स्थिर होणं महत्वाचं आहे, हा समाज स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करायला हवेत. नेत्यांनी समाज स्थिरस्थावर करण्यावर भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

इतरांसारखंच वागायचं का?

आम्ही नाशिकमध्ये खूप कामं केली. 5 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. पाणी प्रश्न मिटवला. हे चांगलं आहे की वाईट? लोकांनी साथ दिली तर हुरुप येतो. लोकांना नेमकं हवं काय आहे? इतरांसारखंच वागायचं का?, असा सवाल करतानाच कामाची अपेक्षा करायची आणि निवडणुकीवेळी मतदान वेगळ्याच पद्धतीने करायचं असं कसं चालणार? असं ते म्हणाले.

काम करूनही पराभव

लोक कामाची अपेक्षा करतात. मतदान दुसऱ्याला करतात. त्यामुळेच वर्षानुवर्षे तेच प्रश्न राहतात. गटारी तुंबल्या, रस्ते तसेच, प्रश्न तेच, वर्षानुवर्षे तसंच सुरू राहतं. समाजाने काम केलं तर शाबासकी द्यावी, काम नाही करणार त्याला बाजूला करावं, हे जेव्हा घडेल तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल, असं सांगतानाच अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठं काम केलं, पण नशिबी काय आलं, तर पराभव, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राला मदत का नाही?

वादळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले. त्यांनी गुजरातला एक हजार कोटीचं पॅकेज दिलं. महाराष्ट्र आणि गोव्याला का मदत दिली नाही? असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारने असं वागायला नको. केंद्र आणि राज्याने हातात हात घालून काम करायला हवं, असंही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी कोरोना काळात मुख्यमंत्र्यांना फोन केले, असं त्यांनी स्पष्ट केलं.

घरातच राहायचं तर मास्क का लावायचा?

मास्क लावण्याला माझा विरोध नाही, पण घरातचं राहायचं तर मास्क का घालायचा? मास्क लावलेल्या लोकांना कोरोना झाला नाही का? मी रुग्णालयात ऑपरेशनसाठी गेलो होतो. मास्क लावल्यामुळे गुदमरायला होत होतं, असं ते म्हणाले. दुसरी लाट आली तेव्हा आपली सरकारं अॅलर्ट नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. (bjp in rule because of modi, says raj thackeray)

संबंधित बातम्या:

डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, फडणविसांचा टोला

संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका; देवेंद्र फडणवीसांची टीका

HSC exam: केंद्रीय शिक्षणमंत्री तब्येत बिघडल्याने रुग्णालयात, बारावीच्या परीक्षेचा निर्णय आता पंतप्रधान मोदी घेणार?

(bjp in rule because of modi, says raj thackeray)

Published On - 6:00 pm, Tue, 1 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI